आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना 'भाेंग्यां'चा त्रास आत्ताच का झाला? खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मशिदीवरील भोंग्यावरून टीका करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी टीका केली.

'राज ठाकरे यांच्याकडे लोक एंटरटेनर म्हणून पाहतात. त्यांच्या सभांना येतात पण मत देत नाहीत. राजकारणात तुम्ही इतकी वर्षे आहात, तुमच्या कानाला मशिदीवरील भोंग्याचा आताच त्रास व्हायला लागला का? ,' असा सवालही त्यांनी शुक्रवारी केला. मनसेच्या गुरुवारच्या मेळाव्यात हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आक्रमक भाषण केले. त्यावर टीका करताना खासदार इम्तियाज जलील म्हणालेे, 'काँग्रेसच्या स्टेजवर वावरणारे राज ठाकरे इतके दिवस धर्मनिरपेक्ष होते. परंतु शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यानंतर आता हा मुद्दा स्वतःकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पक्षाचा झेंडा बदलणे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणे हा त्याचाच एक भाग आहे. राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आजच कसा व्हायला लागला.? असा सवाल त्यांनी केला.
 

बातम्या आणखी आहेत...