आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Why Do Not India And Pakistan Together? Ask Nepal Minister Gyawali To Sushma Swaraj 

भारत-पाकिस्तान एकत्र का नाही? नेपाळचे मंत्री ग्यावालींनी दिले अमेरिका-उत्तर कोरियाचे उदाहरण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गतवर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्यात समेट घडून आला. ते एकत्र येऊ शकत असतील तर मग इतर देश तसे का करू शकत नाहीत, असा प्रश्न नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांनी विचारला आहे. पाकिस्तानने तसे प्रयत्न केले पाहिजेत, असे नेपाळने सुचवले. 

 

ग्यावाली भारत दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या बैठकीत सार्क परिषदेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले, सिंगापूरमध्ये ट्रम्प-उन यांची ऐतिहासिक बैठक झाली होती. चर्चेतूनच मतभेद दूर केले जाऊ शकतात. हे दोन कट्टर शत्रू एकत्र येऊ शकत असतील तर भारत-पाकिस्ताननेही एकत्र आले पाहिजे. पाकिस्तानने त्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत. दोन्ही देशांतील तणावामुळे सार्क परिषदेच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह आहे. ही बैठक आयोजित करणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवाद पोसला आहे. त्यातून भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. २०१६ मध्ये इस्लामाबादमध्ये सार्क देशांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले, परंतु जम्मू व काश्मीरमध्ये लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बैठकीत सहभागी होता येणार नसल्याचे कळवले. त्यानंतर बांगलादेश, भूतान बैठकीवर बहिष्कार टाकला. 

 

काेण जवळचे ? भारत की चीन ? 
नेपाळने गेल्या काही वर्षांत चीनसोबतचे संबंध अधिक दृढ केले आहेत. त्यामुळे नेपाळ-चीन संबंधावर ग्यावाली यांनी पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले, भारत व चीन यांच्यासोबत नेपाळच्या संबंधाची तुलना करणे अयोग्य ठरेल. भारतासोबत नेपाळचे खूप चांगले संबंध आहेत. त्याची तुलनाच इतर कोणाशी होऊ शकत नाही. चीनशीदेखील चांगले संबंध आहेत. पण दोन्ही देशांची तुलना केली जाऊ नये, असे ग्यावाली यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...