आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यंदा व्हेलेंटाईन वीकला आज 7 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवड्याच्या काळात तरुणाई दर दिवशी एक प्रेमाचा दिवस साजरा करतात. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ 'व्हॅलेंटाइन डे'चा इतिहास तसेच कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.
प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला.
केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाईन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.
जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता डे
- 07 फेब्रुवारी : रोझ डे - एकमेकांना गुलाब किंवा अन्य फुले देऊन रोझ डे साजरा करण्यात येतो. खासकरून प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाब हा आपल्या जोडीदाराला देण्यासाठी वापरला जातो.
- 08 फेब्रुवारी : प्रपोज डे - या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीकडे भावना व्यक्त करू शकता. या दिवसाचे हेच महत्त्व आहे.
- 09 फेब्रुवारी : चॉकलेट डे - या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोड व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीप्रती असलेल्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
- 10 फेब्रुवारी : टेडी डे - या दिवशी टेडी किंवा भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात. ती भेटवस्तू आपल्या जोडीदारासाठी एक छान भेट असते.
- 11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे - या दिवशी एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले जाते. त्याचबरोबर ते निभावण्यासाठी एकमेकांना कमिटमेंट दिली जाते.
- 12 फेब्रुवारी : हग डे - या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा आपल्या मित्र मैत्रिणींना मिठी मारली जाते. या वर्षी, हग डे मंगळवारी साजरा केला जाईल.
- 13 फेब्रुवारी : किस डे - व्हॅलेंटाईन डेच्या आधीचा दिवस, म्हणजेच 13 फेब्रुवारी हा 'किस डे' म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतीक असलेलं 'किस' म्हणजे तुमच्या जोडीदारासाठी एक छान भेटच असते.
- 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे - हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरसाठी रोमॅंटिक डेट पासून ते गिफ्ट पर्यंत अनेक प्लॅन केले जातात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.