Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

दारू प्यायल्यावर इंग्रजीत का बोलायला लागतात काही माणसं? कारण मोठे रंजक आहे !

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:03 AM IST

दारू प्यायल्यावर परभाषेत बोलण्याचे कारण ऐकून व्हाल थक्क

 • Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

  मदिरापान केल्यानंतर पिणाऱ्याच्या वागण्या-बोलण्यात मोठा फरक पडतो हे तर सर्वश्रुत आहे. काही जण बरळायला लागतात, तर काही वेडेवाकडे चाळे करायला लागतात. तुम्हीही हे लक्ष देऊन पाहिले असेल की, दारू प्यायल्यानंतर ज्यांना इंग्रजीचा गंधही नाही अशा व्यक्ती न अडखळता इंग्रजीत बोलायला लागतात.

  > सगळीकडेच येणारा हा अनुभव आहे. परंतु असे का होते, परक्या भाषेत अचानक माणसे बोलू कशी शकतात, यामागचे कारण एका संशोधनाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दारू प्यायल्यानंतर परभाषेत बोलण्याचे कारण...

 • Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

  या रिसर्चनुसार थोडीशी दारू प्यायल्यावर नवी भाषा बोलण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सायकोफर्माकोलॉजी जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या या रिसर्चमध्ये संशोधकाने 50 विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. हे सर्व कॉलेज स्टुडंट्स होते. हॉलंडच्या एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांने नुकतीच डच भाषा आत्मसात केली.

   

 • Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

  काहींना पाजली दारू, तर काहींना पाजले पाणी या 50 विद्यार्थ्यांपैकी काही जणांना दारू पाजण्यात आली, तर काहींना साधे पाणी प्यायला देण्यात आले. रिसर्चनुसार एका व्यक्तीसोबत 2 मिनिटे परकीय भाषेत बोलायचे होते, अशा दोन भाषातज्ज्ञांना बोलावले गेले ज्यांना त्या भाषेचे चांगले ज्ञान होते. त्यांना हे सांगितले नव्हते की, कोण दारू प्यायले आहे आणि कोण नाही!

 • Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

  वॉल्युंटियर्स सर्वांशी बोलल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला रेटिंग द्यायची होती. ज्यांनी फक्त पाणी पिऊन संवाद साधला, त्यांच्या बोलण्यात कोणताही फरक आढळला नाही. परंतु ज्यांनी थोडीशी दारू प्यायली होती त्यांचे उच्चार आणि फ्ल्यूएन्सी पाणी पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगली होती. दारू पिणाऱ्यांनी परकीय भाषेत अचूक संवाद साधला होता.

 • Why Drunk Men Often Speak In Foreign Language Here Is Surprising Reason

  तथापि, संशोधकांनी हे मात्र कबूल केले की, जास्त दारू पिण्याचा उलट परिणाम होऊ शकतो. दारू प्यायल्याने जिभेवर नियंत्रण राहत नाही, तो अडखळू लागतो आणि मग अस्खलित बोलणे अवघड होऊन बसते. अति मद्यसेवनामुळे आत्मविश्वासही कमी होतो. बहुतांश वेळा दारू प्यायल्यानंतर परफॉर्मन्सवरही परिणाम पडतो. संशोधकांचे मानणे आहे की, या रिसर्चला दुसऱ्या भाषांबाबतही जोडून पाहिले जाऊ शकते. उदा. एखादा इंग्रजीचा गंध नसणारा, थोडीशी दारू प्यायल्यानंतरही सफाईदारपणे इंग्रजी बोलायला लागतो. 

   

Trending