आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सूर्यास्तानंतर का करू नये श्राद्ध, घराच्या छतावर कावळ्यासाठी का ठेवले जाते अन्न

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शनिवार, 14 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरु झाले असून 28 सप्टेंबरला समाप्त होत आहे. या दिवसांमध्ये पितरांसाठी तर्पण, पिंडदान इ. शुभ कर्म केले जातात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, श्राद्ध पक्षात कोणकोणते काम करावेत आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

1. पितरांसाठी श्रद्धेने करण्यात आलेले कर्मच श्राद्ध असते. भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावास्येपर्यंतचा काळ महालया नावाने ओळखला जातो. मान्यतेनुसार या काळात पितर आपल्या वंशजांच्या छतावर निवास करतात, यामुळे श्राद्ध पक्षात छतावर जेवण ठेवले जाते आणि पितर कावळ्याच्या रूपात अन्न ग्रहण करतात.

2. पितरांसाठी श्रद्धेने तर्पण, पिंडदान करावे. गाय, कुत्रा आणि कावळ्यासाठी अन्न वाढून ठेवावे. ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. श्राद्ध पक्षात करण्यात आलेल्या शुभ कामामुळे पितर देवता प्रसन्न होतात आणि धन, विद्या, अपत्य, सुख, आरोग्य, सुख-समृद्धी प्रदान करतात.

3. श्राद्ध पक्षात दुपारच्या वेळी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इ. कर्म करावे. लक्षात ठेवा, सूर्यास्तानंतर श्राद्ध करू नये. या वेळेला श्राद्ध कर्म केल्यास त्याचे फळ मिळत नाही.

4. तुम्ही खूप श्रीमंत असाल तरीही श्राद्ध कर्म जास्त विस्ताराने करू नये.

5. चतुर्दशी तिथीला अपघातामध्ये मुत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध करावे.

6. श्राद्ध कर्म एकांत आणि गुप्त स्वरूपात करावे. बाहेरच्या लोकांना याविषयी सांगू नये.

7. दुसऱ्यांच्या जागेत श्राद्ध करू नये. वन, पर्वत, पुण्यातीर्थ आणि मंदिर दुसऱ्याची जागा मानली जात नाही, कारण यावर कोणचीही मालकी नसते. यामुळे अशा ठिकाणांवर श्राद्ध केले जाऊ शकते.

8. श्राद्ध काळात काम, क्रोध आणि अधार्मिक कार्यापासून दूर राहावे.

9. श्राद्ध पक्षामध्ये गरिबांना घरात बसवून जेवू घालावे. या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांचे विशेष आदरातिथ्य करावे.

10. श्राद्धामध्ये गाजर, कांदा, लसूण, दह्यामध्ये मिसळलेले पीठ खाऊ नये. हे सर्व पदार्थ श्राद्ध काळात वर्ज्य सांगण्यात आले आहेत.

0