आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Why Give Death Penalty, Delhi Air Killing Us Anyway, Nirbhaya Convict Asks Supreme Court

दिल्ली प्रदूषणामुळे असेही मरणारच, मग फाशी का देताय? निर्भयाच्या दोषीची सुप्रीम कोर्टात याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फाशीची वेळ जवळ आलेली असताना दिल्लीतील निर्भयाच्या दोषीने सुप्रीम कोर्टात अजब युक्तीवाद मांडला आहे. दिल्लीत प्रदूषण इतके वाढले की आम्ही असेही मरणारच आहोत. मग, आम्हाला फाशी देण्यापेक्षा सोडून द्या असे 4 आरोपींपैकी एकाने म्हटले आहे. निर्भया बलात्कार आणि हत्येचा दोषी अक्षय सिंहने कोर्टात एका याचिकेतून ही मागणी केली. निर्भयाच्या दोषींपैकी तो एकमेव आहे ज्याने फाशीवर फेरविचार याचिका दाखल केली आहे. बलात्कार आणि हत्येचा दोषी अक्षयने याचिकेत म्हटले, की "दिल्लीतील वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाचा उल्लेख या ठिकाणी करावाच लागेल. दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाण्यात विष आले आहे. दिल्लीतील पाणी आणि हवेत किती प्रदूषण झाले याची सर्वांना माहिती आहे. दिल्लीत आयुषमान असेही खूप कमी आहे. मग, मृत्यूदंड काय देत आहात?"

16 डिसेंबर 2012 च्या रात्री आपल्या मित्रासोबत घरी परत येताना एका धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कार इतका पाशवी होता की उपचारातून वाचणे शक्यच नव्हते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली होती. त्यापैकी एकाला अल्पवयीन असल्याने कमाल 3 वर्षांची शिक्षा (अल्पवयीनांना कायद्यानुसार असलेली कमाल शिक्षा) दिली. दुसऱ्याने तुरुंगात आत्महत्या केली. तर उर्वरीत 4 जणांना मृत्यूदंड सुनावण्यात आला. त्यामध्ये अक्षय सिंह ठाकूर, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांचा समावेश आहे. यापूर्वी मुकेश, पवन आणि विनय या तिघांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली आहे. अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचना सुद्धा केली. काही दिवसांपूर्वीच ती याचना परत घेण्याची मागणी केली. आता या चौघांना 16 डिसेंबर रोजी फाशी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...