आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गोव्यात मजा करणे पडणार महाग, खुल्यावर दारू पिल्यास भरावा लागेल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या या मागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा : सोनेरी वाळूवर बसलेले लोक, पायाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि हातात मद्याचा प्याला, गोव्यात असे  दृश्य पाहायला मिळणे ही सामान्य बाब आहे. पण आता हा नजारा काळ्याच्या पडद्याआड जमा होणार आहे. गोवा सरकारने आता खुल्यावर दारू पिणे आणि जेवण करण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री अजगांवकर यांनी यावर बंदी आणण्याचे विधेयक सादर केले आहे. असे केल्यास त्या व्यक्तींनी शिक्षा देण्याची विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. 


विधेयकाची खास वैशिष्ट्ये

> खु्ल्यावर दारू पिणे किंवा जेवण करण्यावर प्रतिबंध असणार आहे. यामध्ये सर्व बीच आणि पब्लिक प्लेसचा समाविष्ट असणार आहे. 
> एखादा व्यक्ती खुल्यावर दारू पिताना किंवा जेवण करताना आढळली तर त्याला 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. 
> एखादा समुह या कायद्याचे उल्लघंन करताना आढळला तर त्याच्याकडून 10 हजार रूपये दंड वसूल करण्यात येईल. 
> दंड न भरल्यास 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 


गोवा पर्यटन स्थळे कायदा 2001 मध्ये दुरुस्ती

गोवा सरकारने 'गोवा पर्यटन स्थळे (संरक्षण आणि देखभाल) कायद्यात' बदल केले आहेत. लोकांनी या नवीन नियमांचे पालन करावे याची जबाबदारी वाइन शॉप देखील असणार आहे. बदललेल्या कायद्यानुसार दारू विक्री करणारे सर्व दुकानदार ग्राहकांनी पर्यटन स्थळांवर मद्याच्या बाटल्या घेऊन जायची परवानगी देणार नाहीत. 


पुढे वाचा....का घेतला हा निर्णय?
 

 

बातम्या आणखी आहेत...