आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 रूपयांचे पेट्रोल सरकार का 71 रूपयांना विकत आहे, संसदेत झाला खुलासा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत टॅक्स आणि डीलर्सच्या कमीशन विना पेट्रोल (Petrol Price) वर फक्त 34.04 रूपये प्रति लीटरची कॉस्ट येते, तर डीझल (Diesel Price) वर 38.67 रूपये प्रति लीटरची कॉस्ट येते. सरकारने संसदेत सांगितले की, मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये 96.9 टक्केस आणि डीझलमध्ये 60.30 टक्के भागीदारी टॅक्स आणि डीलर्स कमीशन (dealers commissions) ची असते.

 

पेट्रेल आणि डिझेलवर असा टॅक्स वसुल करते सरकार
आर्थिक राज्य मंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी संसदेत माहिती दिली की, 19 डिसेंबरला पेट्रोलची रिटेल किंमत (Petrol Retail Price) 70.63 रूपये प्रति लीटर होती. यात प्रति लीटर 17.98 रूपये एक्साइज ड्यूटी (Excise duty), 15.02 रूपये स्टेट वॅट (State VAT) आणि 3.59 रूपये डीलर्स कमीशन सामील आहे. तर 19 डिसेंबरला डीझलची रिटेल किंमत 64.54 प्रति लीटर होती, यात 13.83 रूपये एक्साइस ड्यूटी, 9.51 रूपये स्टेट वॅट आणि 2.53 रूपये डीलर कमीशन सामील आहे.


का वेगळी असतात किंमती?
हे खरे आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मार्केटनुसार ठरवल्या जातात. देशभरात पेट्रोल आणि डीझेलच्या किमती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत लागणाऱ्या वॅटवर ठरते.

पुढे त्यांनी सांगितले की, मागच्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान एक्साइज ड्यूटीच्या माध्यमातुन पेट्रोलवर 73,516.8 कोटी रूपये आणि डीझलवर 1.50 लाख कोटींचा रेव्हेन्यू मिळाला आहे.

 
एक्साइज ड्यूटी कमी केल्यामुळे झाले 7 हजार कोटींचे नुकसान
चालु आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात क्रमश 25,318.10 कोटी रूपये आणि डीझएलवर 46,548.8 कोटी रूपये मिळाले. सरकारला पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किमती थांबवण्यासाठी ऑक्टोबरमध्ये एक्साइज ड्यूटी (Excise duty) कमी कारावी लागली. 4 ऑक्टोबरला एक्साइज ड्युटी कमी केल्यामुळे सरकारला 7 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...