आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांना अंत्यसंस्कारात मनाई, हे आहे धक्कादायक कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ऐकल्या जाते. त्यातच पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करत बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांना लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते. असेही म्हटले गेले आहे की हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिंध प्रांतातील हिंदूना त्यांच्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाही. त्यांना मृतदेह दफन करावे लागतात. पण त्यात पूर्ण सत्यता नाही. पाकिस्तानमध्ये बराच हिंदू समाज बळजबरीने परंतु संपूर्ण रिती-रिवाजांनी मृतदेहाचे दफन करते. परंतु यामागचे दुसरे कारण आहे.


पैसे नसल्यामुळे हिंदू मृतदेहाचे करत नाहीत अंत्यसंस्कार
> गरीब हिंदू कुटुंबांना अंत्यसंस्कारासाठी 8 ते 15 हजार रुपयांचा गरज पडते. यामध्ये लाकूड, नारळ, तूप, अगरबत्ती, सुकामेवा इत्यादींवर खर्च करावा लागतो. पाकिस्तानमध्ये सर्वांची व्यवस्था करणे अवघड आहे.

> याशिवाय, दलित हिंदूंचा एक मोठा भाग थार वाळवंटामधून येतो. 1899 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे उपासमारी आणि रोगराईमुळे लोकांचे मृत्यू होत होते. अशातच अंत्यसंस्कार करणे खूप महागाचे झाले होते. त्यामुळे लोकांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफनविधी करायला लागले. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे.

> हिंदू परंपरा टिकवण्यासाठी काही हिंदू कुटुंबे मृतदेहाच्या शरीराच्या एक लहान भागाला अगरबत्तीने जाळतात आणि उर्वरित शरीराला दफन करतात.

 

वेगळीच आहे दफनविधीची  पद्धत

> आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदूंचा दफनविधी मुस्लिम पद्धतीने केला जात नाही. हिंदू मृतदेहांना ध्यान मुद्रेत दफन केले जाते. यासाठी मुसलमानांसारख्या कबर नाही, तर एक गोल खड्डा खोदण्यात येतो आणि त्यावर शंकुच्या आकाराची समाधी तयार केली जाते.
> जेव्हा ही प्रथा पाकिस्तान बाहेरील लोकांना माहित झाली तेव्हा पाकिस्तानमधील हिंदूंना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आली असून हिंदू मृतदेह दफन करत असल्याची अफवा पसरली होती. 

> कराची येथील एक तरुण हिंदू नेते म्हणतात की, आमच्या या प्रथेशी सरकारला काहीही घेणं-देणं नाही. या प्रथेला आम्ही हिंदूंनी स्वतःला निवडले आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारने आम्हाला स्वतंत्र जमीन देखील दिली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...