आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला महालक्ष्मीसोबत श्रीगणेश आणि सरस्वतीची पूजा का केली जाते?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 27 ऑक्टोबरला दिवाळी आहे. प्रत्येक वर्षी अश्विन मास अमावस्या तिथीला दिव्यांचा सण दिवाळी साजरा केला जातो. यादिवशी देवी लक्ष्मीसोबतच श्रीगणेश आणि देवी सरस्वतीचे विशेष पूजन केले जाते. देवी-देवता आणि अवतारांच्या चित्रामध्ये लाईफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सूत्र दडलेले आहेत. लक्ष्मीसोबत श्रीगणेश आणि देव सरस्वतीच्या चित्रामध्ये काही खास संदेश दडलेला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, दिवाळीला लक्ष्मीसोबतच सरस्वती आणि श्रीगणेशची पूजा देखील का केली जाते... - लक्ष्मी धनाची देवी आहे. सरस्वती ज्ञानाची तर गणपती बुध्दीचे देवता आहे. याचा अर्थ असा आहे की, आपण फक्त धनाचेच अवाहन करु नये, सोबतच ज्ञान आणि गणपतीला देखील बोलवावे. धन आले तर ते आपल्या ज्ञानाने सांभाळा आणि बुध्दीचा उपयोग करुन त्याचा उपयोग करा. असे केल्याने लक्ष्मीचा स्थायी निवास होईल. - यामुळे दिवाळीला आपण लक्ष्मीला प्रार्थना करतो की, लक्ष्मीने आपल्या घरी यावे आणि सोबत विद्या आणि बुध्दीला देखील आणावे. सरस्वतीचे स्थान लक्ष्मीच्या डाव्या आणि गणपतीचे उजव्या बाजूला असते. यामागील कारण आहे की, मनुष्याचे डाव्या बाजूचे मस्तिष्क ज्ञानासाठी असते. त्या बाजूला आपले ज्ञान एकत्र होते आणि उजव्या बाजूचे मस्तिष्क रचनात्मक असते. गणपती बुध्दी देवता आहे, आपली बुध्दी रचनात्मक असली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...