परंपरा / पूजेसाठी सकाळची वेळच का सर्वश्रेष्ठ असते?

सकाळी पुजेमध्ये केलेल्या ध्यानामुळे डोके चांगले चालते. 

दिव्य मराठी वेब टीम

May 09,2019 02:23:00 PM IST


जीवनमंत्र डेस्क - आपण देवाची पुजा कधीही करू शकतो पण उपासणा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते. ब्रह्म मुहूर्तात पुजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. उज्जैन येथील ज्योतिषाचार्य मनीष शर्मा यांच्या माहितीनुसार जाणून घ्या सकाळी पुजा करणे का मानले जाते शुभ...

धार्मिक महत्व
ब्रह्म मुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानले जाते. सकाळी उठून उपासणा केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. पहाटे सर्योदयाच्यावेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात. जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते. अगदी तसेच सकाळी सकाळी सर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दुपारी 12 ते 4 ही वेळ पित्रांच्या पुजेसाठी शूभ मानली जाते.

मानसशासत्रीय महत्व
देवाची उपासणा करताना आपले शांत ठेवावे. शांत मनाने आपण पुजेत ध्यान देऊ शकतो. एकाग्रताशिवाय केलेली पुजा कधीच यशस्वी होत नाही. सकाळची वेळ पुजा करण्यासाठी श्रेष्ठ असते, कारण झोपेतून जागल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते. डोक्यात कोणतेही विचार नसतात. देवाच्या भक्तिसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे. म्हणून सकाळी पुजा करणे अधिक शुभ मानले जाते.

आरोग्यासाठी फायदेशीर
सकाळी केलेल्या पुजेने आपल्या एवढे बळ मिळते की, आपण दिवसभर सहज तणावमुक्त राहतो. सकाळी लवकर उठल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो. त्वचेची चमक वाढते, पोटासंबंधी आजारापासून आपला बचाव होतो. सकाळी पुजेमध्ये केलेल्या ध्यानामुळे डोके चांगले चालते.

X
COMMENT