आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल चटणीबरोबर तुम्ही जे स्वादीष्ट मोमोज खाता त्याचे सत्य आले समोर, डॉक्टरांनी स्वतः केले आहे Alert

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - स्ट्रीट फूड हे जवळपास प्रत्येकालाच आवडत असते. पाणीपुरी, समोसे, कचोरी, मोमोज, बर्गर हे लोक चवीने खात असतात. दिल्लीतील अशाच विक्री होणाऱ्या पदार्थांवर इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग अँड न्यूट्रिशन पुसाने अभ्यास केला आहे. त्यानुसार या सर्वांमध्ये मोमोज हा सर्वात वाईट पदार्थ असल्याचे समोर आले आहे. त्याची क्वालिटी आणि त्याबरोबर मिळणारी तिखट चटणी यामुळे खाणारी व्यक्ती आजारी पडू शकते. त्यात गरजेपेक्षा जास्त फिकल मॅटर वापरले जाते. त्यामुळे शरिराला हानी पोहोचते. 


याबाबत आम्ही मेडिकल कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर नीरज जैन (MS आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्ट्रीट फूडशी संबंधित बाबींवर बारकाईने मार्गदर्शन केले. तसेच अशा पदार्थांमुळे होणार्या आजारांबाबतही सांगितले. 


आधी जाणून घ्या, मोमोज का आहेत धोकादायक?
रिपोर्टनुसार मोमोज तयार करण्यासाठी ब्लिचिंग मैदा वापरतात. तसेच त्यात अनेक केमिकल्सचा वापरही होतो. त्यात मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) असते. ते आपल्या हाडांना कमकुवत बनवते. त्यामुळे नर्व्हस डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते. मोमोजमध्ये वापरली जाणारी पत्तागोबीही चांगली शिजवलेली नसते. तर चटणी एवढी तिखट असते की पाइल्सचा आजार होऊ शकतो. तर नॉनव्हेज मोमोजमध्ये खराब किंवा आधीच मेलेल्या चिकनचे फिलिंग केले जाते. अशा स्थितीत त्यात बॅसिलस सेरस, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिगेंस, स्टेफिलोकोकस ऑरियस आणि साल्मोनेला बॅक्टेरिया तयार होतात. 


काय म्हणाले तज्ज्ञ 
डॉ. नीरज यांच्या मते फ्राइड किंवा फ्राइड फिलिंग पदार्थांचे ठरावीक वेळेनंतर विघटन होऊ लागते. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. तेलात तळलेले पदार्थ जास्तीत जास्त 6 ते 8 तासांनी खराब व्हायला सुरुवात होते. ते फ्रिजमध्ये ठेवले तर ते 12 तासांपर्यंत टिकते. या काळानंतर हे पदार्थ खाल्ले तर पोटात कळ येणे, टायफाइड, उलटी, जुलाब, अॅसिडिटी असे आजार होऊ शकतात. 


टाइफाइड सर्वात धोकादायक 
या आजारांमध्ये टायफाइड आणि डिसेंट्री सर्वात धोकादायक आहे. स्ट्रीट फूडमध्ये खराब पाण्याचा वापर झाल्यास टाइफाइडचा धोका वाढतो. त्यामुळे आतड्यांना छिद्र पडू शकतात. म्हणजे आतडे फाटू शकतात. तर डिसेंट्रीमध्ये शौचेच्या वेळी रक्त पडते. 


उपाय 
शक्यतो स्ट्रीट फूड टाळा. शक्य असेल तर स्वच्छता असेल अशा ठिकाणीच खा. त्याठिकाणची क्वालिटी तुम्हाला माहिती असेल तर. स्ट्रीट फूडमध्ये अनेकदा तेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही स्ट्रीट फूड खाऊन याल तेव्हा कोमट पाणी प्या. त्यानंतरही तुमची रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. 

बातम्या आणखी आहेत...