आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Why Not Case Against Police...? Criminal Verdict After High Court Decision Police

पोलिसांवर गुन्हा का नाही...? हायकोर्ट चौकशीनंतर गुन्ह्याचा निर्णय : पोलिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १३ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह जतन करण्याचे आदेश

दीप्ती राऊत / मंदार जोशी 

हैदराबाद- अत्याचार करून डाॅ. दिशाचा खून करणाऱ्या चार आरोपींच्या एन्काउंटरविरोधात तेलंगण उच्च न्यायालयात सोमवारी पहिली सुनावणी झाली. पीयूसीएल (पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी ) विरुद्ध महाराष्ट्र सरकार २०१४ या खटल्यातील मार्गदर्शक सूचना तुम्ही पाळल्यात का? असल्यास पोलिसांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल न्यायमूर्ती ए. अभिषेक रेड्डी आणि राघवेंद्र चौहान यांच्या खंडपीठाने सोमवारी पोलिसांना केला. त्यावर चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले. तर याच प्रकरणात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.डॉ. दिशाच्या बलात्कार व खून प्रकरणात अटकेत असलेल्या चार जणांचे ६ डिसेंबर रोजी पोलिसांनी एन्काउंटर केले होते. तर ही कारवाई बेकायदेशीर आहे, असा आक्षेप घेत काही महिला संघटनांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. न्यायालयाने त्याचे याचिकेत रूपांतर करून घेतले आहे. त्याची सोमवारी सुनावणी झाली. त्यात १३ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह जतन करुन ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.संबंधित. देश- विदेश  पोलिसांना विचारले तीन महत्त्वाचे प्रश्न 


१ न्यायमूर्ती : एन्काउंटरबाबत पीयूसीएल विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना तुम्ही पाळल्यात का?  
 अॅडव्होकेट जनरल : होय, वाचल्या आहेत.  त्यानुसारच कारवाई झाली आहे. 
२ मग पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे का?
 अॅडव्होकेट जनरल : याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
३ एन्काउंटर नियमाप्रमाणे असेल तर त्याचे पुरावे कोर्टात सादर करा
अॅड जनरल :  होय, पुढील सुनावणीपर्यंतची वेळ द्यावी.


एसआयटी करणार चाैकशी : एन्काउंटर प्रकरणाच्या चाैकशीसाठी तेलंगणा सरकारने रविवारी ‘एसआयटी’ची नेमणूक केली आहे. आठ जणांच्या पथकाचे नेतृत्व राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्याकडे असेल. पथकात महिला अधिकारी व इतर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मानवाधिकार आयोगही एन्काउंटरची चाैकशी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...