आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत' चित्रपटात भन्साळींची पहिली पसंत होता प्रभास, पण या कारणामुळे नाकारला सिनेमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'पद्मावत' चित्रपटाने या वर्षांच्या सुरुवातीस बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. दीपिका, रणवीर आणि शाहिद तिघांच्याही अभिनयाचे कौतुक झाले. परंतू संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत ही रणवीर नव्हता. त्यांना या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला घेण्याचा विचारण्यात केला होता.

 

राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर यांची निवड आधीच झालेली होती. परंतु महारावल रतन सिंहच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करावी हा प्रश्न निर्मात्यांना पडला होता. तेव्हा पहिली पसंत म्हणून प्रभासला विचारणा करण्यात आली होती. ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासच्या अभिनयाने भन्साळी प्रभावित झाले होते.

 

यामुळे दिला होता नकार 
प्रभासला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. परंतू तो त्यावेळी 'बाहुबली 2' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. यासोबतच त्याला महारावल रतन सिंहच्या भूमिकेसाठी प्रभासला घेण्याचा विचार होता, त्यामुळे संभ्रमित झाला. या भूमिकेला अपेक्षित वाव मिळणार नाही असे त्याला वाटले.‘बाहुबली’मुळे मिळालेली प्रसिद्धी आणि प्रेक्षकांसमोर निर्माण झालेला प्रभाव या भूमिकेमुळे थोडाफार कमी झाला असता म्हणून त्याने या भूमिकेस नकार दिला. अखेर प्रभासच्या जागी त्या भूमिकेसाठी शाहिद कपूरची वर्णी लागली.

 

बातम्या आणखी आहेत...