आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 डिसेंबरलाच का साजरा करतात \'NAVY DAY\'? एकही जवान न गमावता भारताच्या नौदलाने असा बदलला होता इतिहास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लष्कर हे कोणत्याही देशाचा महत्त्वाचाच भाग आहे. याच्या वेगवेगळ्या शाखा देशाची सुरक्षा करत असतात. समुद्री सीमा असलेल्या देशांमध्ये नौसेनेचे विशेष महत्त्व असते. जगातील अनेक देश आपल्या नौसनेच्या सन्मानार्थ वेगवेगळे दिवस साजरे करतात. भारतात आज ४ डिसेंबरला 'नेव्ही डे' साजरा केला जातो. परंतु 4 डिसेंबर रोजीच 'नेव्ही डे' का साजरा केला जातो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यामागे आपल्या नौसेनेच्या शौर्याची मोठी गोष्ट आहे. ज्यात भारतीय नौजवानांनी पाकिस्तानची जलसीमा ओलांडून त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या एक दिवसाआधी 3 डिसेंबरला पाकिस्तानने भारतीय सीमाभागावर जोरदार हल्ले चढवले होते. तेव्हा या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणुन भारताने 'ट्रायडेंट' या कोडअंतर्गत हल्ला केला होता. या ऑपरेशनचे वैशिष्ट म्हणजे या युद्धात भारताचे काडीमात्रही नुकसान झाले नव्हते.

 

भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोडले कंबरडे 

> 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 4 डिसेंबरला भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलावर हल्ला चढवून पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले होते.
> 4 डिसेंबरच्या हल्ल्यात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या चार युद्धनौकांना जलसमाधी घातली होती. सोबतच कराची बंदरावरील इंधनाच्या साठ्यांना नष्ट करुन जवळपास 500 पेक्षा जास्त पाकिस्तानी नौसैनिकांना मारले होते.
> भारताने आपल्या INS निपत, INS निरघट आणि INS विक्रांत या तीन युद्धनौकांच्या मदतीने हल्ला चढवून पाकिस्तानी नौसेनेला मोठे नुकसान पोहचवले होते.
> या युद्धादरम्यान दक्षिण आशिया क्षेत्रात भारतीय नौदलाने पहिल्यांदा 'अँटी शिप' (नौकाभेदी) मिसाइलचा वापर केला होता. या युद्धात भारतीय नौसेनेने सहा मिसाइल डागून चार पाकिस्तानी जहाजांना नष्ट केले होते. या युद्धात भारताचा एकही सैनिक शहीद न झाल्याने नौयुद्धाच्या इतिहासातील यशस्वी ऑपरेशनपैकी एक मानतात.  
> नेव्ही-डे या दिवशी भारतीय नौसेना आपले शक्तीप्रदर्शन करुन शहीदांना मानवंदना देते. या दिवशी अनेक ठिकाणी भारतीय नौसेना आपल्या युद्धनौकांना आणि विमानांना प्रदर्शनासाठी ठेवते. 

 

बातम्या आणखी आहेत...