आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावी ही काळजी, क्रेडिट कार्डच्या Hidden charges मुळे वाढते परतफेड रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्ड हे काळाची गरज बनत चालले आहे. काही जण स्वतःकडे एक नाही दोन-तीन क्रेडिट कार्ड ठेवत आहेत. याचे कारण म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे नसले तरी आपण क्रेडिट कार्डद्वारे ठरावीक रक्कम खर्च करू शकतो आणि याची परतफेड करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळतो. इतकेच नाही तर क्रेडिट कार्डद्वारे अनेक वस्तूंची खरेदी केल्यावर आपल्याला विविध डिस्काउंट्स सुद्धा मिळतात.

 

क्रेडिट कार्डचे इतके सगळे फायदे असले तरी त्याचा जास्त वापर आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. आपल्याला जर मोठी बचत करायची असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डपासून दूर राहणे फायदेशीर असेल. टॅस्स एक्सपर्ट आणि सीए हिमांशु कुमार यांच्या मते, या पाच करणांमुळे आपण क्रेडीट कार्डचा कमीत कमी वापर करावा. 

 
पहिले कारण : लोक क्रेडिट कार्डचा वापर आपल्या पैशांप्रमाणे करतात. 

लोक क्रेडिट कार्डचा वापर करताना हे विसरतात की हा स्वतःचा पैसा नसून उधार घेतलेला पैसा आहे. तो व्याचासहीत परत करावा लागतो. लोक क्रेडिट कार्डने पेमेंट करताना आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करतात. अशातच लोकांना त्यांनी तयार केलेल्या आर्थिक लक्षापर्यंत पोहोचणे अवघड होते. यामुळे क्रेडिट कार्ड एखाद्या जाळ्यापेक्षा कमी नाही. 
 
पुढे वाचा....इतर कारणांसंबंधी...... 

बातम्या आणखी आहेत...