आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासुने लावले विधवा सुनेचे दुसरे लग्न, मुलगी म्हणून घरातून केली पाठवणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालोद(छत्तीसगड)- जिल्ह्यातील बालोदपासून 2 किलोमीटर दूर हीरापूर गावात अमिताभ-हेमा यांचा चित्रपट "बाबुल" गोष्ट सत्यात उतरली आहे. येथे दोन वर्षांपासून विधवेचे जीवन जगत असलेल्या सुनेचे सासू आणि कुटुंबातील इतर लोकांनी लग्न लावून दिले. 9 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि डेमेंद्र साहुसोबत लग्न झाले होते. दोन वर्षांपूर्वी 20 एप्रिल 2017 ला फागुनदाहमध्ये एका लग्नादरम्यान पती डोमेंद्र साहूचा अकस्मात मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूसमयी ज्ञानेश्वरी तीन महिन्यांची गरोदर होती.


 
या घटनेमुळे ज्ञानेश्वरीला इतका मोठा धक्का बसला की, तिचे बाळ पोटातच मृत झाले. दोन वर्षांपासून ती विधवेचे आयुष्य जगत होती. सुनेला या अवस्थित पाहून सासुला राहावलं नाही आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचे दुसरे लग्न लावालचे ठरवले. या दरम्यान कोमल राम साहू राहणार साल्हे याचे लग्नासाठी बोलणे आले. ज्ञानेश्वरीच्या माहेरचेदेखील या लग्नासाठी तयार जाले. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजता ज्ञानेश्वरीचे लग्न झाले आणि ती आपल्या सासरी गेली.