आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 2 ग्लास दूध घेऊन आली नवरी, म्हणाली- तुमच्या ग्लासात गावरान तूप आहे, आपण दोघे एकत्र पिऊ..., मग सकाळी जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होता पती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा) - 22 दिवसांपूर्वी जी तरुणीला पत्नी बनवून युवकाने घरी आणले, ती फरार झाली. रात्री पतीला दुधात गावरान तूप घातले अन् काहीतरी मिसळून ते पाजले. दूध पिताच पतीला गाढ झोप लागली. यानंतर पत्नी घरातून फरार झाली. रात्रभर पती बेशुद्धावस्थेत होता. सकाळी सात वाजता डोळा उघडला आणि बेडवरून उठताच चक्कर येऊन खाली पडला. घरच्यांना आवाज दिल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर म्हणाले- तरुणाला गुंगीचा ओव्हरडोस देण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणाने यमुनानगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.,

 

20 ऑक्टोबरला झाले होते लग्न
यमुनानगर जिल्ह्यातील रहिवासी युवकाने सांगितले की, नातेवाइकाने 3 महिन्यांपूर्वी हे स्थळ आणले होते. 20 ऑक्टोबरला लग्न झाले. लग्नानंतर सर्वकाही ठीक सुरू होते. रविवारी रात्री पत्नी दोन ग्लास दूध घेऊन आली. ती म्हणाली की, दोघेही एकत्र पिऊत. तिने दूधात गावरान तूप टाकले होते. यादरम्यान तो ते दूध प्यायला. परंतु पत्नीने दूध घेतले नाही. तिने दूधात गुंगीचे औषध मिसळल्याचा आरोप आहे. परंतु युवकाने दूध पिताच त्याला गाढ झोप लागली. रात्रभर त्याला कळलेच नाही की, तो कुठे झोपलेला आहे. सकाळी 7 वाजता डोळा उघडला तेव्हा चक्कर येत होती. पत्नी 25 हजार रुपये रोख आणि दीड लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, त्याचा मोबाइलही घेऊन पसार झाली. युवकाने सांगितले की, त्याचा एक शर्ट आणि पँटही गायब आहे. त्याला संशय आहे की, तेही त्याची पत्नी घेऊन गेली.

 

भाऊबिजेला पत्नीने माहेरातून मागवले डॉक्यूमेंट
भाऊबिजेच्या निमित्ताने नवविवाहितेच्या कुटुंबातील काही जण सासरी आले होते. यादरम्यान नवविवाहितेने आपल्या माहेरातून डॉक्यूमेंट मागवले होते. त्यात तिचे दहावीचे सर्टिफिकेट होते. नवविवाहितेच्या पतीचे म्हणणे आहे की, तिने आधीपासूनच पळून जाण्याची प्लॅनिंग केलेली होती. परंतु त्याला तिच्यावर जराही संशय आला नव्हता. ती सर्वांशी चांगली वागत होती. तिच्याकडे स्वत:चा मोबाइलही नव्हता.


मुलीच्या घरचे म्हणतात- तुम्हीच गायब केली आमची मुलगी
वरपक्षाच्या मंडळींनी सांगितले की, सकाळी जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यानी तिचे माहेरी फोन करून कळवले. पण उलट तिच्या माहेरच्यांनीच आरोप केला की, तुम्हीच आमची मुलगी गायब केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...