आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा १५ लाखांसाठी छळ करुन जिवे मारण्याची धमकी; पोलिस निरीक्षक पतीविरुद्ध गुन्हा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बदलीसाठी पतीने पत्नीकडे केली पैशांची मागणी

जळगाव- चांगल्या पोलिस ठाण्यात बदलीसाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरून आणावे यासह इतर कारणांवरून पत्नीचा शारीरिक तसेच मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस अधिकारी असलेल्या पतीविरुद्ध पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.


अकोला येथे डाबकी पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक किशोर वानखेडे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची पत्नी योगिता हिने फिर्याद दिली आहे. नाशिक येथील सिडको चाणक्यनगरातील रहिवासी योगिता यांचे सन २०११ मध्ये अमळनेर येथील किशोर वानखेडे याच्यासोबत लग्न झाले.


लग्नाच्या वेळी योगिताच्या कुटुंबीयांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण १५ लाखांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. यानंतर नाशिक, बुलडाणा या ठिकाणी त्यांची बदली झाली. दरम्यानच्या काळात योगिता यांना एक मुलगी व मुलगा झाला. पती किशोर याने योगिता यांना  सतत मारहाण व शिवीगाळ करायचा.  तसेच गेल्या काही दिवसांपासून माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू केला होता.  
 

बातम्या आणखी आहेत...