आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 25 वर्षांनंतर पत्नीने पतीवर लावला बलात्काराचा आरोप; म्हणाली, तीन वर्षांपासून करत होता अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - राजस्थानातील एका गावात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने 25 वर्षांपासून सोबत राहणाऱ्या पतीवर बलात्काराचा आरोप लावला आहे. महिलेने सांगितल्याप्रमाणे, 25 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. या दरम्यान त्यांना 3 मुले-मुली देखील झाल्या. परंतु, याच वर्षी एप्रिल महिन्यात त्या दोघांचे भांडण वाढले आणि प्रकरण समाजाकडे गेले. सामाजिक बैठकीत दोघांशी चर्चा करण्यात आली तेव्हा पतीने अचानक सर्वांना घटस्फोटाची कागदपत्रे दाखवली. यानंतर आपल्या मुलांना घरात ठेवून पत्नीला हकलून दिले.


नेमके काय झाले?
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 40 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तिने लावलेल्या आरोपांप्रमाणे, 25 वर्षांपूर्वी त्या दोघांचा विवाह झाला होता. घरात नेहमीच भांडणे सुरू असायची. एप्रिल महिन्यांत भांडण इतके वाढले की समाजातील ज्येष्ठ मंडळींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अचानक पतीने सर्वांना दोघांच्या घटस्फोटाची कागदपत्रे दाखवली. 
- त्यानुसार या दोघांचा 3 वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला होता. यानंतर महिलेला घरातून हकलून दिले. आपल्याला या घटस्फोटाबद्दल काहीच माहिती नव्हते. कागदपत्रांत 3 वर्षांपूर्वी घटस्फोटाचा दावा करण्यात आला आहे. म्हणजे, गेली 3 वर्षे मला सोबत ठेवून तो रोज बलात्कार करत होता असे आरोप महिलेने लावले आहेत. या दोघांना 22, 20 आणि 15 वर्षे वय असलेली मुले-मुली आहेत. 
- महिलेने आपल्या पतीच्या विरोधात केवळ बलात्कारच नव्हे, तर स्त्रीधन चोरण्याचे आणि मारहाणीसह मुलांना आपल्याजवळ बळजबरी ठेवण्याचे आरोप लावले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटस्फोट दोघांच्या मर्जीने झाला होता की खरोखर महिलेसोबत फसवणूक झाली याचा देखील पोलिस शोध घेत आहेत. पतीवर आरोप सिद्ध झाल्यास त्याला भा.द.वि. कलम 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...