आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Husband च्या विचित्र वागण्याला वैतागली Wife; म्हणाली, घरी आलेल्या प्रत्येकाला माझ्या 'त्या' गोष्टी दाखवतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - साता जन्माच्या गाठी म्हटल्या जाणारे लग्नाचे बंधन सद्यस्थितीला काही वर्षेही टिकवणे कठिण झाले आहे. लग्नानंतर पती किंवा पत्नीकडून मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले जातात. असेच एक ताजे प्रकरण गुजरातमध्ये समोर आले आहे. येथील एका 32 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तो गेल्या अनेक महिन्यांपासून आपले मानसिक आणि लैंगिक शोषण करत असल्याचे आरोप तिने यात लावले आहेत. तत्पूर्वी आपल्या पतीला सुधरण्यासाठी तिने दीड वर्षांचा वेळही दिला होता. परंतु, पतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट त्याने आणखी छळ करण्यास सुरुवात केली. 


थाटात झाला होता विवाह, तिसऱ्या महिन्यातच हकलून दिले...
गुजरातमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने सांगितले, की "गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात माझा विवाह झाला होता. लग्न झाल्याच्या काही दिवसांतच पतीने मानसिक छळ सुरू केला. आपल्या माहेरून हुंडा आणला नाही अशी तक्रार तो नेहमीच करत होता. त्याचे अत्याचार सहन केल्यानंतर कालांतराने सुधरण्यासाठी वेळ देखील दिला होता. परंतु, दिवसेंदिवस त्याचा छळ वाढत गेला. यानंतर त्याने फेब्रुवारी महिन्यात मला घराबाहेर काढले. माहेरील आल्यानंतरही त्याने मला जगू दिले नाही. वारंवार फोन करून त्याने 10 लाख रुपयांची मागणी केली. 


घरी आलेल्या सर्वांना दाखवायचा माझे अंडरगार्मेंट्स...
त्याच्या विचित्र वागण्याचा उल्लेखही महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. ती सांगते, "घरी आलेल्या प्रत्येकाला तो नातेवाइक असो किंवा मित्र त्यांना माझा पती माझे अंडरगार्मेंट्स दाखवायचा. आपल्याला पत्नीच्या कुटुंबियांकडून या अंडरगार्मेंट्स व्यतिरिक्त दुसरे काहीच मिळाले नाही. सासऱ्याने मला हुंड्यात हेच दिले असे तो म्हणत होता." पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार केल्याने आपल्या जीवाला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा तिने केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...