आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife And Inlaws Sell Their Newborn Baby, Fathers Complain To Home Ministry, A Shocking Case In A Panipat

पत्नीने आणि माहेरच्यांनी आपल्या नवजात मुलाला विकले, पित्याची गृहमंत्र्यांकडे तक्रार; पानिपतमधील धक्कादायक प्रकरण

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पतीचा दावा- आरटीआयद्वारे समजले, मुलगी नव्हे तर मुलगा झाला-तोही जिवंत

सचिन सिंह 

पानिपत- एक मुलगा.. तोही २०११ मध्ये जन्मलेला. परंतु आता तो जिवंत आहे की मृत यावरून पती-पत्नीत वाद निर्माण झाला आहे. हरियाणातील पानिपतच्या सामान्य रुग्णालयात तिने एका मृत मुलीस जन्म दिल्याचा पत्नीचा दावा आहे. तिला पुरले असल्याचे सांगण्यात येते. तर पत्नीला मुलगी नव्हे, तर मुलगा झाला होता, तोही जिवंत असल्याचे माहितीच्या अधिकारातून आपणास समजले असल्याचा पतीचा दावा आहे.  पत्नीच्या माहेरच्या माणसांनी आपल्या मुलास विकले आहे. मला खोटी माहिती देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याला विकण्यात आल्याचे पत्नीने भांडणात सांगितले. त्यावरूनच मला संशय आला आणि रुग्णालय व महापालिकेत माहितीच्या अधिकारात अर्ज करून माहिती मागितली तेव्हा धक्कादायक माहिती हाती आली. सामान्य रुग्णालयाने पत्नीला मुलगा झाल्याचे उत्तर पाठवले. कागदोपत्री मुलांच्या अंगठ्याची निशाणी आहे. आपण हरियाणाचे मंत्री गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे अर्ज केला आहे, असे सांगितले. 


1. मुलगा झाला, तोही जिवंत १९ सप्टेंबर २०१९ मध्ये सामान्य रुग्णालयात माहिती अधिकार अर्जावर उत्तर देताना म्हटले की, अनिता हिने १० आॅक्टोबर २०११ रोजी एका जिवंत मुलास जन्म दिला. अॅडमिट फाइलमध्ये पालकांनी जिवंत मूूल मिळाल्याचे अंगठा निशाणीवर लिहून दिले. सुटी न  घेताच अनिता घरी निघून गेली. 

2. जन्म प्रमाणपत्र तयार

जन्मानंतर रुग्णालयातून फॉर्म भरून महापालिकेस पाठवले गेले. मनपाने मुलाचे जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नोंदणी क्रमांक दिला. प्रमाणपत्रात मुलाचे नाव दीपक आईचे नाव अनिता व वडिलांचे नाव नरेंद्र असल्याचे सांगितले. १३ ऑक्टोबर २०११ ची नोंद आहे. 


3. सव्वा वर्षानंतर दिले नाव : नोव्हेंबर २०१९ मध्ये मनपाने माहिती अधिकार अर्जाचे उत्तर दिले. मुलाचे नाव दीपक असे २१ जानेवारी २०१३ रोजी लिहिलेले आहे. नरेंद्र म्हणाले, जन्म प्रमाणपत्र कोणास मिळाले? या प्रश्नावर मनपाने उत्तर दिलेले नाही. मनपाने माहिती दिली असती तर सर्व गुपित उघड झाले असते. 

भांडणानंतर पत्नी गेली माहेरी, खोटे कोण...? माहिती अधिकारात सापडले रेकॉर्ड


पानिपतच्या नरेंद्र यांचे २००८ मध्ये अनिताशी लग्न झाले. २०११ मध्ये अनिता गर्भवती राहिली. तेव्हा आमच्यात भांडण झाले. ती माहेरी गेली. १२ ऑक्टोबर २०११ रोजी तिच्या वडिलांनी अनिताला मृत मुलगी झाल्याचे मला सांगितले. नरेंद्र यांनी विश्वास ठेवला. २०१४ मध्ये मुलगी व २०१६ मध्ये मुलगा झाला. पुन्हा भांडणे झाल्यानंतर २०१७ मध्ये माहेरी गेली. नरेंद्रने पत्नीला मुले परत मागितली. तेव्हा ती चिडली आणि पहिला मुलगा होता त्याला विकले असे तिने सांगितल्याचा नरेंद्रने आरोप केला. मला संशय आला आणि मी तपास सुरू केला, असे नरेंद्रने सांगितले.