आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने पतीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; पती गंभीर जखमी; गुन्हा दाखल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मुलाच्या वाढदिवसानिमित्त पती सासुरवाडीला गेला असता त्याच्या पत्नीने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. ही घटना माता नगरमध्ये शुक्रवारी घडली. या प्रकरणी पतीने रामदास पेठ पोलिस ठाण्यात पत्नी व सासूविरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी दोघींवरही गुन्हा दाखल केला आहे. 

 

मंगेश गणेश तायडे (वय २८ ) असे मारहाण करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून मंगेश त्याच्या पत्नी व दोन मुलांसह उल्हास नगर येथे राहून मोलमजुरी करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने पत्नी मातानगर येथे माहेरी आली. त्यानंतर तो दोन्ही मुलांना घेऊन तिच्या पाठोपाठ आला होता. शुक्रवारी एका मुलाचा वाढदिवस असल्याने तो पत्नीच्या आईकडे आला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले म्हणून मंगेश त्याच्या आईकडे निघून गेला. मात्र पत्नीच्या माहेरी असलेली बॅग घेण्यासाठी तो पुन्हा गेला असता त्याची सासू कोकिळा खरात हिने त्याची कॉलर पकडली व मुलगी पाठवण्यास नकार देत तुझे दोन्ही मुले घेऊन जा असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मंगेश आल्यापावली परतला असता त्याच्या पत्नीने त्याच्या डोक्यावर मागून कुऱ्हाडीने हल्ला केला. 
 

बातम्या आणखी आहेत...