Home | Maharashtra | Pune | Wife attacked on husband in pune

माेबाइलवर बोलताना मध्येच हटकले, संतापलेल्या पत्नीचे पतीच्या गळ्यावर सुरीने वार

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2019, 10:03 AM IST

“कोणाशी बोलत आहेस?’ अशी विचारणा करणे बेतले जीवावर

  • Wife attacked on husband in pune

    पुणे - सतत माेबाइलवर कोणाशी बोलते, असे पतीने विचारल्याने संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीच्या गळ्यावर सुरी फिरवल्याचा धक्कादायक प्रकार सिंहगड रोडवरील रायकर मळा येथील ओवी अंगण सोसायटीत शुक्रवारी उघडकीस आला.

    या घटनेत अविनाश लक्ष्मण रोहकले (३३) हा जखमी झाला आहे. त्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पत्नी भारती अविनाश रोहकले (३०) हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे. ९ एप्रिल राेजी रात्री नऊच्या सुमारास पत्नी फोनवर बोलत असल्यामुळे पतीने तिला “कोणाशी बोलत आहेस?’ असे विचारले. त्यामुळे भारतीला राग आला. या रागातूनच भारतीने चाकूने पतीच्या गळ्यावर वार करून त्यास जखमी केले. यानंतर अविनाश याला रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Trending