आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री पतीने घरात आणली प्रेयसी, चिडून पत्नीने उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - विवाहिता रात्री पती घरी परत येण्याची प्रतीक्षा करत होती. परंतु, पती घरी येताना एका तरुणीलाही घेऊन आला. पतीने पत्नीला प्रेयसीची ओळख करून दिली. हे पाहताच पत्नीने खूप संताप केला. पतीला त्या तरुणीला घराबाहेर घालवण्यासाठी सांगितले. यासाठी पती तयार नाही झाला म्हणून महिलेने वरच्या मजल्यावर रूममध्ये गळफास लावला. यादरम्यान, सासरच्यांनी धाव घेत तिला वाचवले. 

 

खोखराकोट मधील विवाहित तरुण गुरुग्रामच्या एका कंपनीत नोकरी करतो. तेथे त्याच्या संपर्कात एक तरुणी आली. यानंतर रात्री तो तरुणीला घेऊन घरी पोहोचला. यावर पत्नी प्रचंड चिडली. पत्नीने इशारा दिला की, त्या युवतीला ताबडतोब घराबाहेर काढा, पण पतीने नकार दिला.

 

यानंतर पत्नीने रागात वरच्या मजल्यावर धाव घेतली. रूमची कडी लावून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्या सासरच्या मंडळींनी तिकडे धाव घेतली. त्यांनी रूमचे दार तोडून तिला फासावरून खाली उतरवले. यानंतर सासरच्यांनी प्रकरणात हस्तक्षेप करत तरुण आणि त्याच्या प्रेयसीला रात्रीच घराबाहेर काढले. तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...