आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवा चौथच्या दिवशीच नवऱ्याची बायकोने केली धुलाई, पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, पोलिस म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- करवाचौथच्या दिवशी नवऱ्याच्या कारनाम्याला कंटाळुन बायकोने  भर बाजारात नवऱ्याला मारले. आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करुण प्रकरण शांत केले. घटनेनंतर नवऱ्याने पोलिस ठाण्यात बायकोविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिस म्हणाले की, हे त्यांच घरगुती प्रकरण असल्यामुळे आम्ही यात हस्तक्षेप करु शकत नाहीत.  

घटना जानकारीपुरम परिसरातील आहे. पीडित नवऱ्याने सांगितले की, त्याच्या बायकोचे प्रीपेड सिम त्याच्या नावावार आहे. काही दिवसांपासुन त्यांच्यामध्ये भांडन चालु आहे. काहीतरी कारण काढुन बायकोला फसवण्याच्या उद्देशाने त्याने तिचे प्रिपेड सिम पोस्टपेड केले. ज्यामुळे दर महीन्यात बील आल्यवर त्याला कळत होते की, ती कोणासोबत किती वेळ बोलत आहे.

 

पण झाल याच्या उलट
जेव्हा ही गोष्ट बायकोला कळाली तेव्हा त्याचा हा डाव त्याच्यावरच उल्टा पडला. बायकोने लगेच नवऱ्याच दुकान गाठल अणि भांडण सुरु केले. दुकानामध्ये ज्यास्त ग्राहक असल्यामुळे आपण घरी जाउन बोलु असे म्हणाला. दोघे गाडीवर बसुन घरी गेले. घरी जात असताना परत त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यानंतर बायकोने गाडी थांबवायला लावली आणि रस्त्यातच नवऱ्याला मारणे सरु केले. त्यामुळे नवऱ्याने राजाजीपुरम ठाण्यात तक्रार दाखल केली. इंस्पेक्टर उमाकांत दीपकने सागितले की, आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...