Home | National | Madhya Pradesh | Wife become sub inspector now dont want to live with Pandit husband in Bhopal

पूजा-पाठ करून एका पंडिताने आपल्या पत्नीला केले सब इंस्पेक्टर, पदभार स्वीकारताच बदलली पत्नीची वागणूक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 05:34 PM IST

पत्नी पतीला म्हणाली-मला सांभाळायची तुझी आता लायकी नाही

  • Wife become sub inspector now dont want to live with Pandit husband in Bhopal

    भोपालळ(मध्यप्रदेश)- शिक्षण घेऊन अधिकारी बनलेल्या पत्नीने पतीला घटस्फोट दिल्याचा प्रकार भोपाळच्या बैरसियामध्ये समोर आला आहे. येथील एका पंडीताने मेहनत करून पैसे कमवले आणि आपल्या पत्नीला शिकवले आणि पोलिस विभागात सब इंस्पेक्टर बनवले. पद स्वीकारताच पत्नीला घंमड चढला आणि तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला. तिचे म्हणने आहे की, आता पतीची लायकी नाहीये, मला तो सांभाळू शकत नाही.


    पत्नीला आपल्या पायावर उभे केले
    - पीडित व्यक्ती म्हणाला की, लग्नाच्यावेळी पत्नी काहीच करत नव्हती. पत्नीला आपल्या पायावर उभे करण्यासाठी खूप मेहनत केली. भोपाळमध्ये राहून तिला कोचिंग लावली. तीन-चार वर्षांत ती अधिकारी बनली पण आता तिला घमंड आला आहे. तिला माझ्यासोबत राहायचे नाहीये. तिने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे, आणि तिचे म्हणने आहे की, आता पतीची लायकी नाहीये तिला सांभाळायची.

Trending