आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिंद (हरियाणा) - शहराच्या हनुमाननगरात एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी आणि गुरुवारी रात्रीदरम्यान घडली. हत्या करणारा आरोपी तरुण मृताच्या मावशीचा मुलगा आहे. दोघांच्या अवैध संबंधांमुळे ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून आरोपी तरुण फरार आहे.
चेहरा एवढा विद्रूप केला की, ओळखूसुद्धा येऊ नये
- सूत्रांनुसार, मृत जोगिंद्र (26) चा 5 वर्षीय मुलगा अमरजितचा बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्त सोनिपतमधून त्याच्या मावशीचा मुलगा रवीसुद्धा आला होता. रात्री जोगिंद्रचे दोन मित्र घरी आले. रवी, जोगिंद्र आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून पार्टी केली. रात्री उशिरा सर्व झोपायला गेले.
- जोगिंद्रचे वडील मंगल यांचा आरोप आहे की, रात्री उशिरा रवी आणि जोगिंद्रची पत्नी पिंकी (24) ने मिळून चाकूने भोसकून त्यांची हत्या केली.
- दोघांनी जोगिंद्रवर चाकूने 20 हून जास्त वार केले. चेहरा ओळखूसुद्धा येणार नाही एवढा विद्रूप केला.
- हत्येनंतर रवी फरार झाला आणि पिंकी आपल्या सासू-सासऱ्यांकडे रडत-रडत पोहोचली. ती म्हणाली- तिच्या नवऱ्याला काय झाले, काहीच कळत नाहीये. ती ढोंग करू लागली. मंगलने रूममध्ये जाऊन पाहिले तर जोगिंद्रचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता.
पोलिसांना आला संशय, चौकशीत पत्नीने सांगितले सर्व सत्य
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहिले तर मृत जोगिंद्रची आई ढसाढसा रडत होती, तर त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती. पोलिसांना संशय आला, त्यांनी पत्नीची चौकशी केल्यावर तिने सगळं सांगून टाकलं.
- पत्नी म्हणाली- पती आमच्या वाटेत काटा बनला होता. त्याला रवीने घरी येणे पसंत नव्हते. मलाही पतीसोबत राहायचे नव्हते, म्हणून त्याचा खून करावा लागला.
- डीएसपी रामभज म्हणाले- अवैध संबंधांमुळे पिंकी आणि रवीने जोगिंद्रची चाकूने भोसकून हत्या केली. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- मृत जोगिंद्रचे वडील म्हणाले की, माझ्या मुलाला आधीपासूनच रवीवर संशय होता. त्याला रवीचे घरी येणे पसंत नव्हते. या संशयामुळेच पिंकी आणि रवीने त्याची एवढी निर्घृण हत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.