Home | National | Gujarat | wife catches husband with his girlfriend

नव-याचे शेजारच्या महिलेसोबत सुरु होते अफेअर, पत्नीने लपून मोबाइलमध्ये घेतले दोघांचे फोटो आणि व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:14 PM IST

सीटीएममध्ये परस्त्रीसोबत अफेअर असणा-या नव-याला एका पत्नीने चांगलाच धडा शिकवला.

 • wife catches husband with his girlfriend

  अहमदाबादः सीटीएममध्ये परस्त्रीसोबत अफेअर असणा-या नव-याला एका पत्नीने चांगलाच धडा शिकवला. पत्नीने तिचा नवरा आणि प्रेयसीला रंगेहात पकडून भररस्त्यावर दोघांनाही चांगलाच चोप दिला. पत्नीचे रौद्ररुप बघून नवरा तेथून पळून गेला.

  नव-याला प्रेयसीसोबत रंगेहात पकडण्यासाठी गच्चीवर लपली होती पत्नी...
  सीटीएममध्ये राहणा-या 30 वर्षीय निकिताचे लग्न ऋषीसोबत झाले होते. त्यांच्याच शेजारी राहणा-या 21 वर्षीय दीपिकासोबत ऋषीची ओळख झाली आणि दोघांचे अफेअर सुरु झाले. दोघांनी त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले होते. निकिताला हे फोटो आणि व्हिडिओ ऋषीच्या मोबाइलमध्ये दिसले. तिने ऋषीला त्याचे विवाहबाह्य संबंध संपुष्टात आणण्यास सांगितले. पण ऋषीने तिचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे निकिताने ऋषीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी निकिता बाहेर जात असल्याचे खोटे सांगून गच्चीवर जाऊन लपली आणि तिथे ऋषी आणि दीपिकाच्या येण्याची प्रतिक्षा करु लागली. ऋषी दीपिकाला भेटायला निघाल्यानंतर निकिताने त्याचा पाठलाग केला आणि दोघांना एकत्र पकडले. निकिताचे रौद्ररुप बघून ऋषीने तेथून पळ काढला, तर दीपिकाची निकिताने चांगलेच चोपले.

  प्रेयसीच्या आईवडिलांनी केले निकितासोबत भांडण...
  निकिता आणि दीपिकाचे जेव्हा भांडण सुरु होते, तेव्हा तिथे दीपिकाचे आईवडील आले. निकिताने तिच्या नव-याचे आणि दीपिकाचे एकत्र असलेले फोट आणि व्हिडिओ त्यांना दाखवले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या मुलीला काही म्हणण्याऐवजी दीपिकाचे आईवडील निकिताशीच भांडू लागले. तुझा नवरा माझ्या मुलीसोबत असे संबंध कसे काय ठेऊ शकतो?, असे त्यांनी निकिताला सुनावले.

  पत्नीने अनेक फोन केल्यानंतरही आला नाही पती..

  पती-पत्नी आणि वो असा प्रसंग रस्त्यावर सुरु होता. पळून गेलेल्या नव-याला निकिताने फोन करुन परत बोलावले असता तो तिथे आला नाही आणि हे प्रकरण आणखीनच चिघळत गेले.

Trending