आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसी म्‍हणाली- तुझ्या पतीचे कारनामे पाहायचे असतील तर मी सांगते तेथे ये, पत्‍नी म्‍हणाली- सिंगापूरला जायचे म्‍हणून निघाला होता निर्लज्‍ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - पत्‍नीशी खोटे बोलून प्रेयसीसोबत अय्याशी करणा-या युवकाला नोएडा सेक्‍टर-58 च्‍या एका गेस्‍ट हाऊसमध्‍ये पत्‍नीने रंगेहाथ पकडले. तेही प्रेयसीच्‍या मदतीने. युवक मर्चंट नेव्‍हीचा कर्मचारी आहे. रविवारी सिंगापूरला जाण्‍याच्‍या बहाण्‍याने तो घराबाहेर निघाला होता. मात्र नंतर आपल्‍या प्रेयसीला घेऊन तो नोएडाच्‍या गेस्‍ट हाऊसमध्‍ये गेला होता. 

 

युवकाने प्रेयसीला आपण अविवाहित असल्‍याचे सांगितले होते. मात्र प्रेयसीला त्‍याच्‍यावर संशय आला होता. नंतर तिने याची चौकशी केली असता युवक विवाहित असल्‍याचे तिला माहित झाले. यामुळे युवकाला धडा शिकवण्‍यासाठी ती त्‍याच्‍यासोबत नोएडाच्‍या गेस्‍ट हाऊसमध्‍ये गेली व तेथे गेल्‍यावर तिने युवकाच्‍या पत्‍नीला फोन लावला. यावेळी प्रेयसी म्‍हणाली, तुझ्या पतीचे कारनामे पाहायचे असतील तर मी सांगते त्‍या पत्‍त्‍यावर ये. नंतर पत्‍नी पोलिसांसोबत त्‍या गेस्‍ट हाऊसवर गेली व दोघांना एकमेकांसोबत रंगेहाथ पकडले. यावेळी पत्‍नीने पोलिसांना सांगितले की, 'हा निर्लज्‍ज सिंगापूरला जायचे आहे म्‍हणून घराबाहेर निघाला होता. मात्र बाहेर तो असे गुलछर्रे उडवत असेल, याची मला जराही कल्‍पना नव्‍हती.' मात्र दोन्‍ही महिलांना युवकाने माफी मागितल्‍यामुळे कोणीही त्‍याच्‍याविरोधात पोलिसांत तक्रार दिली नाही.

 

एका वर्षापूर्वी युवकाने तरूणीशी केली होती मैत्री 
मर्चंट नेव्‍हीचा हा कर्मचारी दिल्‍लीत पत्‍नीसोबत राहतो. कंपनीच्‍या कामानिमित्‍त अनेकदा त्‍याला विदेश जावे लागते. जवळपास एका वर्षापूर्वी त्‍याची ओळख तरूणीशी झाली. यादरम्‍यान त्‍याने तरूणीला आपण अविवाहित असल्‍याचे सांगितले होते. नंतर दोघांमध्‍येही मैत्री झाली होती. तरूणीने सांगितले की, युवकाने विवाहाचे आमिष दाखवून आपला गैरफायदा घेतला. तो मला नियमितपणे गेस्‍ट हाऊस व हॉटेलमध्‍ये भेटत असे. 


लग्‍नावरून युवक पलटला, त्‍यामुळे तरूणीला आली शंका 
तरूणीने सांगितले की, मी लग्‍नाचा विषय काढताच तो टाळण्‍याचा प्रयत्‍न करायचा. यामुळे त्‍याच्‍यावर शंका येत होती. नंतर त्‍याची चौकशी केली असता तो विवाहित असल्‍याचे मला कळाले. तसेच तो अनेकदा कामानिमित्‍त विदेशात जात असे. मात्र अनेकदा विदेशात जायचे सांगून तो मला हॉटेल व गेस्‍ट हाऊसवर भेटत असे. त्‍यामुळे त्‍याला धडा शिकवण्‍यासाठी मी नोएडा गेस्‍ट हाऊसवर त्‍याला बोलावून त्‍याच्‍या पत्‍नीला फोन लावला.


प्रेयसीने लावला बलात्‍काराचा आरोप 
विवाहाचे आमिष दाखवून बलात्‍कार केल्‍याचा आरोप प्रेयसीने युवकावर लावला होता. मात्र नंतर युवकाने माफी मागितल्‍यामुळे तरूणीने पोलिसांमध्‍ये तक्रार दिली नाही. त्‍यामुळे युवकावर कोणतीही कारवाई करण्‍यात आलेली नाही. 
- पंकज राय, एसएचओ, नोएडा सेक्टर-58 ठाणे

 

 

बातम्या आणखी आहेत...