Home | Divya Marathi Special | wife-comes-marriage-in filmy-style

फिल्मी स्टाईलमध्ये पहिली पत्नी अवतरली

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Update - May 25, 2011, 11:50 AM IST

भोपाल - शहरातल्या नबी बाद परिसरात रविवारी एका लग्न समारंभात चांगलाच गोंधळ माजला.

  • wife-comes-marriage-in filmy-style

    भोपाल - शहरातल्या नबी बाद परिसरात रविवारी एका लग्न समारंभात चांगलाच गोंधळ माजला. इंदूरहून आलेल्या पत्नीने आपल्या पतीचे तिसरे लग्न थांबवले. भोपाळच्याच एका युवतीशी त्याचे लग्न होणार होते. एनवेळी त्याची पहिली पत्नी, तिची आई आणि बहीण मंडपात पोलिसांना घेऊन आली आणि त्याचे लग्न थांबवले. लग्न करू इच्छिणा:या या नवरदेवाला पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही आहे. या मुलीला पुरावा म्हणून त्याची पहिली पत्नी घेऊन आली होती.

    भोपाळमध्ये रविवारी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत ३७ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार होता. ठरल्याप्रमाणे विधींना सुरुवात झाली. मंडपात संजयसुद्धा नवरदेव बनून बोहल्यावर चढण्यासाठी तयार होता. एवढ्यात संजयची पत्नी राधा पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. आयोजकांकडे तक्रार केल्यानंतर मंडपात चांगलाच गोंधळ उडाला. संजय आणि राधाला ठाण्यात नेण्यात आले. तिथे दोघांमध्ये समझोता होऊन संजयला पहिली पत्नी राधाकडे जावे लागले. यादरम्यान ज्या युवतीशी संजयचे लग्न होणार होते तिला या गोष्टीची एक दिवस आधीच माहिती मिळाल्यामुळे ती लग्नमंडपात पोहोचलीच नाही.

    पतिदेव करणार होते तिसरे लग्न
    सामुदायिक विवाह सोहûयाचे आयोजक मदनलाल रांझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संजयला फोन करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याशी संपर्क झाला नाही. अखेर ज्या युवतीशी त्याचे लग्न होणार होते तिच्या वडिलांना फोनवर संजयच्या फसवेगिरीची माहिती देण्यात आली आणि त्यांनी लग्नमंडपात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली. इकडे तपासात उघड झाले की संजयचे दुसरे लग्नही झाले आहे. दुसरी पत्नी त्याला सोडून गेली आहे. पहिली पत्नी राधाशी संजयने घटस्फोट घेतला नाही, असे राधाचे म्हणणे आहे. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर संजयची फसवेगिरी पूर्णपणे उघड झाली आणि त्याला पहिली पत्नी राधाबरोबर जावे लागले.

Trending