आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीदाची अखेरची इच्छा : 26 व्या वर्षी देशासाठी दिले बलिदान, घरी छथोटा पाहुणा आला तर पत्नीने पूर्ण केले दिलेले वचन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला - सुख आणि दु:ख हे जीवनाचे दोन पैलू आहेत. जर जीवनात एका क्षणामध्ये मोठे दुःख निर्माण होत असेल तर दुसऱ्याच क्षणी आनंदही मिळतो. दहशतवाद्यांसी लढताना शहीद झालेल्या 26 वर्षीय विक्रमजित सिंह यांच्या घरी नव्या पाहुण्याचा जन्म झाला आहे. त्यांची पत्नी हरप्रित कौर यांनी 9 ऑक्टोबरला मुलाला जन्म दिला. बाळाचे नाव फतेह सिंह ठेवण्यात आले आहे. 


विक्रमजित यांनी मृत्यूपूर्वी पत्नीकडून वचन घेतले होते की, मुलगा झाला तर त्याचे नाव फतेह सिंह ठेवले जाईल आणि तोही शत्रूला धूळ चारण्यासाठी देशाची संरक्षण करेल. शहीद विक्रमजित यांच्या आईच्या मते तर नातवाच्या रुपात त्यांचा मुलगाच परत आला आहे. 7 ऑगस्ट रोजी श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना विक्रमजित शहीद झाले होते. 


विक्रमजित यांचे 15 जानेवारी 2018 रोडी यमुनानगरच्या पीबनी गावातील हरप्रितशी लग्न झाले होते. विक्रमजित सिंह यांनी 2015 मध्ये आर्मी जॉइन केली होती. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये त्यांची पहिली पोस्टींग झाली होती. 2016 मध्ये श्रीनगरमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते. त्यांचा लहान भाऊ मोनूही आर्मीत आहे. त्यांच्या तेपला गावातील 300 तरुण आर्मीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...