Home | National | Madhya Pradesh | Wife Died During Husband Firing In Marriage Harsh Firing Before Barat In Jhabua

भावाची वरात निघणारच होती....पोलिस कर्मचारी मेहुण्याने आनंदाच्या भरात केले फायर, पण लग्नाच्या आनंदाचे शोकात झाले रूपांतर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 03:23 PM IST

नवरदेवाच्या बहिणीला लागली गोळी, रूग्णालयात दाखल करतेवेळी झाला मृत्यू

 • Wife Died During Husband Firing In Marriage Harsh Firing Before Barat In Jhabua

  धार/झाबुआ (मध्यप्रदेश) - सोमवारी सकाळी नऊ वाजेसुमारास नकळपते बंदुकीची गोळी लागून एक महिला ठार झाल्याची घटना घडली. आपल्या भावाचे वऱ्हाड घेऊन महिला धार जिल्ह्यात येत होती. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. यादरम्यान आनंदाच्या भरात नवरदेवाच्या मेहुण्याने हवेत गोळ्या झाडल्या. दुसऱ्या वेळेस बंदूक लोड करताना गोळी चालली ती थेट नवरदेवाच्या बहिणीला लागली. कुटुंबीयांनी महिलेला अगोदर सरदारपूर येथील रूग्णालयात दाखल केले. तेथून तिला गंभीर अवस्थेत धार येथील जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हर्ष फायर करणारा महिलेचा पती सुरुवातील सैन्यात होता. तेथून निवृत्त झाल्यानंतर तो पोलिस दलात धार येथील डीआरपीमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता.

  बंदूक लोड करत असताना निघाली गोळी

  परिवार नवरदेवाला घेऊन रवाना होणार होते. दरम्यान नाचगाणे आणि आनंदाच्या उत्साहात मेहुणा अपसिंह निनामाने फायर केले. प्रत्यक्षदर्शी भागीरथनुसार अपसिंह दुसऱ्यांदा फायर करण्यासाठी बंदूक लोड करत असताना गोळी निघाली आणि रजनीला लागली.

  डॉकटरांनी तपासून केले मृत घोषित
  मृत महिलेचे काका पुनिया यांनी सांगितले की, जावयाने फायर करताच गोळी रजनीच्या खांद्याला लागून शरीरात गेली. यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. तिला अगोदर सरदारपूर येथील रूग्णालयात दाखले केले. तेथील डॉक्टरांनी तिला धार जिल्हा रूग्णालयात रेफर केले. तेथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

Trending