आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्याने शेअर केली होती लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट, पण त्याच पोस्टवर लोकांनी कॉमेंट केले RIP अन् So sad!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रविवारी रात्री करनाल-असंध मार्गावरील ठरी गावाजवळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारचा अपघात झाला. ठरी गावाजवळ ऊसाने भरलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला तर पति गंभीर जखमी झाला आहे. तर 7 वर्षीय नमा आणि 5 वर्षीय पिहू थोडक्यात बचावले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर परिश्रमानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी अपघाताची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. असंध येथील रहिवासी रमन आणि त्यांची पत्नी रेखी 2 डिसेंबर रोजी करनाल येथे त्यांच्या लग्नाचा 8 वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांनी ही बाब फेसबुकवर देखील पोस्ट केली होती. 


दिवसभर फेसबुकच्या पोस्टवर शुभेच्छा आणि मग RIP कमेंट

रविवार रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत लोक त्यांच्या पोस्टवर शुभेच्छा देत होते. पण रमन यांच्या अपघाताबद्दल माहित झाल्यावर लोकांनी RIP, सो सॅड कमेंट करण्यास सुरूवात केली. दरम्यान ज्या लोकांपर्यंत घटनेची माहिती पोहोचली नव्हती त्यांनी आरआयपीचे कारण विचारण्यास सुरूवात केली. त्याला अनुसरून कोणी लिहीले की, रीत आता आपल्यात राहिली नाही तर कोणी लिहीले 8 वर्षांचा सुखी संसार मोडला. 


सकाळी फेसबुकवर फोटो अपलोड करून लिहीले होते - आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 
सकाळी 8 वाजून 18 मिनीटाला रमन खंडपुरिया यांनी फेसबुकवर फोटो सोबत आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे कॅप्शन लिहून पोस्ट केली. संध्याकाळी संपूर्ण परिवार लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करनाळ येथे गेला होता. लोकांनी सकाळपासूनच रमन यांच्या फेसबुकवर हॅप्पी मॅरेज लाईफ आणि नाइस कपलच्या कमेंट करत होते. दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परत येताना एका रस्ता अपघातात रीत यांचा मृत्यू झाला.  


अपघाताचे कारण ठरले रस्त्यावरील खड्डे, दररोज होत आहेत अपघात
करनाल ते असंध मार्ग खड्ड्यांनी भरला आहे. यामुळे या रस्त्यावर रोज अपघात घडत आहेत. याआधीही अशा अपघातांमध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला आहे. मृत महिलेच्या परिवाराचे म्हणणे आहे की, रस्त्यावर खड्डे नसते तर आज रेखा ऊर्फ रीत आज त्यांच्यात असती. 

 

बातम्या आणखी आहेत...