आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीत गाडल्याच्या एक दिवसानंतर पत्निने बाहेर काढला पतिचा मृतदेह, एका फोन कॅालने उघड झाले सत्य.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा- येथे एका ढाब्यावर काम करणाऱ्या शहजादचा एका दिवसापुर्वी मृत्यु झाला होता. सामान्य मृत्यु समजुन कुटुंबीयांनी त्याचा अंत्य संस्कार केला. अचानक दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीला एक कॅाल आला ज्यामुळे तिने पोलिसांच्या मदतिने त्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

 

शहजादच्या पत्निला कोणीतरी फोन करून माहीती दिली की, शहजादला त्या दिवशी मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे कुटुबीयांना खुनाचा संशय येत आहे. त्याच्या कुटुबीयांनी चार लोकांवर खुनाचा आरोप लावला आहे.

 

सिहाड़ा रोडवरिल एका ढाब्यावर मोहम्मद शहजादचा संशयास्पद मृत्यु झाला होता.  शहजाद 250 रुपये रोजाने त्या ढाब्यावर एका महिन्यापासून काम करत होता. त्याच्या पत्निने सांगितले की, काही दिवसापुर्वी शहजाद घरी आला आणि मालक रोजाचे पैसे देत नव्हता म्हणुन त्यानंतर कामावर गेलाच नाही.

 

नंतर 5 नोव्हेंबरला चांदचा भाच्चा तनवीर त्याच्यासोबत एका युवकाला घेउन आला आणि शहजादला बळजवरिने ढाब्यावर काम करण्यासाठी घेउन गेला. 

 

सात दिवसानंतर आली मृत्युची बातमी 
शहजादच्या पत्निने सांगितले की, 12 नोव्हेंबरला मला कळाले की, अचानक शहजादचा ढाब्यावर मृत्यु झाला आहे. माझा मुलगा मोहम्मद शाहिद, पुतण्या राजिक आणि खालिद, दिर युसुफ यांना चांदने सांगितले की, शहजादचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर माझ्या मुलांनी हा एक सामान्य मृत्यु आहे असे समजुन त्याच्या मृतदेहाला घरी घेउन आले. 

बातम्या आणखी आहेत...