आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wife Filed Complaint Domestic Violence Against Husband

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पती, पत्नी और वो....' पतीच्या अवैध संबंधाबाबत समज देण्यासाठी गेली होती पत्नी, पण घडले असे की पत्नीने केली पतीवर केस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सूरत : एका महिलेने आपल्या पतीविरूद्ध घरगुती हिंसा केल्याची तक्रार दाखल केली आहे. पती हुंदाई शोरूमचा मालक आहे. पत्नीच्या मते, पतीचे शोरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारीसोबतच्या अवैध संबंधानंतर पती-पत्नीचे रोज भांडण होत होते, याचदरम्यान पतीने तिच्यासाठी पत्नीला मारहाण देखील केलेली आहे. 

 

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील गेहरीलाल जैन यांचा 2000 मध्ये संगीतासोबत विवाह झाला होता. सुरुवातीला मुकेश जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. 2003 मध्ये जैन परिवार व्यापाराच्या दृष्टीने राजस्थानहून सूरतला आला होता. यानंतर मुकेशने 2006 मध्ये उधाना येथे प्रसंग नावाने कपड्याचे शोरूम सुरू केले होते. त्यावेळी मुकेशचा एका मुलीसोब संबंध होते. यामुळे घरात पती-पत्नी मध्ये भांडण होत होते. मुकेशने पुढील काही दिवसांतच पिपलोद येथे सिलिकॉन हुंदाईचे शोरूम सुरु केले. तेथे काम करणार पायल जरीवालासोबत मुकेशचे संबंध होते. या गोष्टीवरून मुकेश आणि संगीतामध्ये अनेकवेळा भांडणं आणि मारहाण झाली होती. 

पतीला समजविण्यासाठी गेली असता पतीने केली मारहाण

 

1 ऑगस्ट 2018 रोजी संगीता जैन आपल्या पतीला समजवण्यासाठी उधना येथील सिलिकॉन हुंदाई शोरूममध्ये गेली होती. यानंतर मुकेशने तिचे केस पकडून तिला मारहाण केली. या भांडणानंतर मुकेश संगीताला सोडून वेगळा राहू लागला. यानंतर 27 डिसेंबर रोजी संगीता पिपलोद येथील शोरूममध्ये कथित प्रेमिका पायलला समज देण्यासाठी गेली होती. पण तेथेही मुकेशने तिला मारहाण केली.