Home | Maharashtra | Mumbai | wife given 35 sleeping pills to husband and injected with phenyl in Thane

झोपेच्या 35 गोळ्या दिल्या तरी मेला नाही पती, नंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने टोचले फिनायलचे इंजेक्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 01:12 PM IST

दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधबाबत गोपीला माहिती मिळाली होती.

 • wife given 35 sleeping pills to husband and injected with phenyl in Thane

  मुंबई- पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या गोपी नाईक याची निर्घृण हत्या पत्नीनेच केल्याचे उघडकीस आले आहे. प्रिया नाईक आणि महेश (प्रियकर) अशी दोन्ही आरोपींची नावे आहे. प्रियाने गोपी ठार मारण्यासाठी झोपेच्या 35 गोळ्या दिल्या होत्या. परंतु तरीही गोपीचा मृत्यू झाला नाही. नंतर प्रियाने प्रियकराच्या मदतीने गोपीला फिनायलचे इंजेक्शन टोचून त्याची हत्या केली.

  पोलिसांनी ‍दिलेली माहिती अशी की, 28 डिसेंबर 2018 रोजी ही घटना ठाण्यात घडली. गोपी आणि प्रिया हे दाम्पत्य आपल्या सात वर्षीय मुलीसोबत ठाणे महापालिकेच्या क्वॉर्टरमध्ये राहात होते. नऊ वर्षांपूर्वी गोप आणि प्रियाचा विवाह झाला होता.

  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोपी आणि प्रियामध्ये दोनवर्षांपासून वाद सुरु होते. फेसबुकच्या माध्यमातून प्रियाची मैत्री महेश नामक तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधबाबत गोपीला माहिती मिळाली होती. गोपीच्या नातेवाईकाने एका मॉलमध्ये प्रिया आणि महेशला एकत्र पाहिले होते. नंतर गोपीने प्रियाला समजही दिली होती. परंतु प्रियाने त्याचे काही ऐकले नाही. प्रियाने गोपीचा काटा काढण्याचे ठरविले. प्रियाने आपला कट महेशलाही सांगितला होता. महेश हा रेल्वे कर्मचारी असून तो नेरळमध्ये राहातो.

  गोपीला पोलिओ आहे. याचा फायदा घेऊन प्रियाने महेशच्या मदतीने त्याच्या जेवणात झोपेच्या 15 गोळ्या मिसळल्या. झोपेच्या गोळ्या महेश याने आणून दिल्या होत्या. जेवण केल्यानंतर गोपी बेशुद्ध झाला. प्रियाला वाटले गोपीचा मृत्यू झाला. नंतर तिने महेशला आपल्या घरी बोलावून घेतले. परंतु काही वेळतच गोपीला शुद्ध आली. तिथे प्रियाचा प्लान फेल झाला. नंतर तिने सायंकाळी गोपीच्या जेवणात 20 गोळ्या दिल्या. गोपी पुन्हा बेशुद्ध झाला. नंतर महेश पुन्हा आला. त्याने आपल्यासोबत फिनायलचे इंजेक्शन आणले होते. प्रियाने फिनायलचे इंजेक्शन गोपीला टोचले. महेशने गोपीचे डोके भिंतीवर आदळले. नंतर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले.

  दुसर्‍या दिवशी 29 डिसेंबरला सकाळी गोपीचा मृत्य झाला. नंतर प्रिया आणि महेश त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गोपीचा अपघात झाला असा बनाव केला. हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. हे पाहून प्रिया आणि महेश हॉस्पिटलमधून फरार झाले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना 1 जानेवारीला माथेरान येथून अटक केली.

Trending