आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी एकटाच मरणार होतो, पत्नी म्हणाली- मी कुणासाठी जगू; दोघे लग्नाप्रमाणे सजले अन्...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवरी (रायसेन, मध्यप्रदेश)- येथील टोला गावातील एका दांम्पत्याने लग्नाप्रमाणे नट्टापट्टा करून आत्महत्या केली.  दोघांनीही लग्नात जे कपडे घातले होते, ते घालून साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेच्या बांगड्यांमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी आपल्या मर्जीने आत्महत्या केल्याचे लिहले आहे. दोन पानाच्या सुसाईडनोटमध्ये मृत तेजरामने छोट्या भावाला आई-वडीलांची काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच पोलिसांनी देखील कुणाला त्रास देऊ नये असे म्हटले आहे. तेजरामने आजाराला कंटाळून आणि खर्च वाढल्याने आत्महत्या केली. त्याने चिट्टीत लिहिले आहे की, मी एकटाच आत्महत्या करणार होतो, पण पत्नी ओमवतीने देखील माझ्यासोबत मरणाची इच्छा व्यक्त केली. मी कोणाच्या आधाराने जगू असे ती म्हणाली. 


आजाराला कंटाळला होता तेजराम...
- रायसेन जिल्ह्यातील देवरी परिसरात 22 वर्षीय तेजराम आणि 20 वर्षीय पत्नी ओमवती शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरात फासावर लटकलेले आढळून आले. यानंतर देवरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली.   
- पोलिस अधिकारी देवेंद्र पाल आपल्या टीमसोबत गावात पोहोचले. दोघाचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोस्टमार्टमनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
- नातेवाईकांनी सांगितले की, तेजराम आजारी होता. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु, यामुळे तो आत्महत्या करेल असे वाटले नव्हते.


3 दिवसांपूर्वी माहेरून सासरी आली होती ओमवती...
- मृत ओमवती तीन दिवसांपूर्वीच रक्षाबंधन साजरे करून सासरी आली होती. नातेवाईकांनी सांगितले की, ओमवती आणि तेजरामचे लग्न 29 एप्रील 2018 रोजी झाले होते. 
- ओमवतीच्या काकांनी सांगितले की, पुतनी लग्नानंतर सासरी खुश होती. तेजराम घर बनवण्याचे काम करत होता. 


देवरी पोलिसांनी सांगितले की, दोघेही एकत्र साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सुसाइड नोटमध्ये मर्जीने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...