आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवराच आलाय समजून तिने उघडले दार, नराधमांनी रात्रभर बांधून केला गँगरेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुरी/ग्वाल्हेर - नुकतीच रांचीच्या एका विवाहितेवर घरात घुसून गँगरेप केल्याची घटना उजेडात आली आहे. दिवसाढवळ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढच झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. असेच एक प्रकरण गतवर्षी उजेडात आले होते.  

शिवपुरीच्या ग्रामीण पोलिस हद्दीतील गौशालामध्ये राहणाऱ्या एका आदिवासी विवाहितेवर 3 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला तिच्या घरातच बांधून ठेवून आळीपाळीने बलात्कार केला. घटनेच्या वेळी पीडिता घरी एकटी होती. पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींविरोधात एससीएसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौशालाची रहिवासी महिला 3 सप्टेंबर रोजी रात्री घरात एकटीच होती. तिचा नवरा मजुरीसाठी शहरातून बाहेर गेलेला होता. रात्री 12 वाजता आरोपी नरेश रावत, अर्पित शर्मा आणि सुनील यादव हे पीडितेच्या घरी पोहोचले. 
-त्यांनी घराचे दार ठोठावले असता, पीडितेला वाटले की, तिचा नवराच घरी आलेला आहे. तिने दरवाजा उघडला.
- तितक्यात तिन्ही आरोपींनी घरात प्रवेश करून पीडितेला दोरखंडाने बांधले आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली. 
- यानंतर आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी पळून गेले. सकाळी पीडितेचा पती घरी परत आल्यावर त्याला तिन्ही नराधमांच्या कुकृत्याची हकिगत पत्नीकडून समजली. यानंतर दोघेही पती-पत्नी पोलिसांत पोहोचले आणि त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
- पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.


पुढच्या स्लाइड्स इन्फोग्राफिकमधून वाचा, पीडितेवर गुदरलेला प्रसंग...

बातम्या आणखी आहेत...