आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा कापला गळा; हत्येनंतर स्वतःला केले पोलिसांच्या स्वाधीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विरार पूर्वच्या भोईरपाडा भागात रविवारी दुपारी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा चिरुन हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी भादंवि 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

प्राप्त माहितीनुसार, आरोपी किशोर फुटाणे (वय 62 वर्षे) पत्नी सुलभा (45 वर्षे) आणि मुलासह भोईरपाडा येथील बाळकृष्ण सोसयटीत राहतो. विरारमध्ये रिक्षा चालवतो. किशोर नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय करत होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. 
 

अशी घडली घटना 
किशोर रविवारी दुपारी 12 वाजता घरी आला होता. तेव्हा पत्नी घरी एकटी होती. एका कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु झाले. हा वाद इतका विकोपाला गेली की, किशोरने कोयत्याने पत्नीचा गला कापला. यानंतर किशोर थेट पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 
 

पत्नीला रंगेहाथ पकडले होते
किशोरला संशय होता की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणासोबत संबंध होते. पती घरातून गेल्यानंतर तो व्यक्ती घरी येत होता. रविवारी दुपारी किशोर अचानक घरी गेला तेव्हा तो व्यक्ती घरी होता. यामुळे पती-पत्नीत भांडण झाले आणि किशोरने पत्नीची गळा चिरुन हत्या केली.