आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालोद(छत्तीसगड)- बालोद जिल्ह्यात होळीच्या रात्री दारूड्या पतीचा पत्नीकडून खून झाल्याची घटना समोर आली आहे. घटना सुरेगाव तालुक्यातील अहिबरन नवागावची आहे. मृत टेशूराम(45) आणि पत्नी राधाबाई पटेल(42) यांच्यात मागील पाच वर्षांपासून रोज वाद होत होते. टेशूराम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
महिलेने गावभर फिरून दिली खूनाची कबुली
टेशूराम होळीच्या दिवशी दारूच्या नशेत घरी गेला, यामुळे पत्नी राधबाई आणि मुलगा गोपाळसोबत त्याचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, टेशूरामने आपल्या मुलाच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला माचीस मिळाली नाही, म्हणून मुलाला जाळू शकला नाही, पण नंतर त्याने चार्जिंगच्या वायरने गोपाळचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या राधाबाईने टेशूरामच्या हातून वायर घेऊन त्याच वायरने त्याचा गळा आवळला. त्यानंतर राधबाई गावभर फिरून मी त्या राक्षसाला मारले असे सांगू लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.