आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांची मुलगी म्हणाली, अंकलने पप्पांचा गळा चिरला; मग समोर आले आईचे घाणेरडे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तिसगडच्या बांदा जिल्ह्यात राहणारी तरुणी एसबीआयमध्ये कॅशिअर असलेल्या एका युवकाच्या प्रेमात पडली. त्या दोघांनी 6 वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या मंजुरीने विवाह केला. यानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र, 22 सप्टेंबर 2018 रोजी त्या प्रेमवीराचा खून करण्यात आला. त्याचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हे सर्व होत असताना त्याची आता 4 वर्षांची असलेली मुलगी पाहत होती. तिनेच पोलिसांना एका अंकलने पप्पांचा गळा चिरल्याची माहिती दिली. यानंतर झालेल्या चौकशीत आईचे घाणेरडे सत्य समोर आले आहे. 


लव्ह मॅरेजनंतरही दिला पतीला दगा...
प्रेम विवाह केल्यानंतरही तरुणीने आपल्या पतीला दगा दिला. मूळचा बांदा जिल्ह्याचा रहिवासी राहिलेला रामकिशोर डोमार बांदा जिल्ह्यातील एसबीआय बँकेत कॅशिअर होता. त्याचा काही वर्षांपूर्वी बाराद्वार येथे राहणारी तरुणी चांदनी उर्फ साक्षीसोबत प्रेम विवाह झाला होता. हे दोघे एका भाड्याच्या घरात राहत होते. याच दरम्यान रामकिशोरच्या घरी कुलदीप साहू नावाचा त्याचा मित्र नेहमीच यायचा. काही दिवसांतच त्याने साक्षीसोबत मैत्री केली आणि पतीच्या गैरहजेरीत साक्षीने कुलदीपसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 


तरीही पतीने दिली होती माफी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकिशोरने कुलदीपला अडीच लाख रुपये दिले होते. ते परत मिळवण्यासाठी वारंवार सांगूनही कुलदीप ऐकण्यास तयार नव्हता. याच दरम्यान कुलदीपचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे रामकिशोरला कळाले. यानंतरही त्याने पत्नीला माफ केले. तसेच यापुढे कुलदीपला भेटायचे नाही असे तिला समजावून सांगितले. परंतु, साक्षीने कुलदीपशी संबंध तोडले नव्हते. पतीच्या गैरहजेरीत ती कुलदीपला घरी बोलवत होती. यानंतर रामकिशोरने फोन करून पुन्हा आपले पैसे कुलदीपकडून परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद पेटला आणि रामकिशोरने कुलदीपला पुन्हा पत्नीला भेटू नकोस असे धमकावले. 


कोड वर्ड 00 म्हणजे घरात पती आहे चॅटिंग नको
कुलदीप साहूने आपल्या प्रेयसी साक्षीच्या नावानेच नवीन सिम कार्ड खरेदी केला होता. त्याचा वापर फक्त हे दोघे चॅटिंगसाठी करत होते. आपल्या गुजगोष्टींचा पतीला पत्ता लागू नये यासाठी त्यांनी काही कोड वर्ड ठरवले होते. कोड 1 अर्थात मी व्यस्त आहे. कोड 11 चा अर्थ घरात नातेवाइक आहेत आणि कोड 00 म्हणजे, घरात पती आहे चॅटिंग करता येणार नाही. यासोबतच, कोड 9 अर्थात पटकन ऑनलाइन ये, कोड 99 म्हणजे मीच ऑनलाइन होऊन चॅट करत आहे. यासोबतच मोबाईल दुसऱ्याच्या हातात देण्यापूर्वी सुद्धा कोड ठरलेला होता. 


4 वर्षांच्या मुलीसमोरच चिरला गळा
यानंतर साक्षीने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी कुलदीपसोबत मिळून प्लॅनिंग केली. पोलिसांनी सांगितले, की 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी साक्षी गणेश विसर्जनाच्या बहाण्याने 4 वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली. तिचा पती रामकिशोर मद्यधुंद अवस्थेत आला तेव्हा तो घरी एकटाच होता. यानंतर पत्नीने प्रियकर कुलदीपला फोन करून पती एकटा असल्याची माहिती दिली. काही वेळानंतर साक्षी आपल्या मुलीसह घरी परतली. त्यावेळी कॅशिअर घरातील सोफ्यावर क्रिकेट मॅच पाहत बसला होता. कुलदीप अचानक घरी आला आणि किचनमधील धारदार चाकू घेऊन प्रेयसी आणि तिच्या मुलीसमोर रामकिशोरचा गळा चिरला. यानंतर रक्ताने माखलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून पसार झाला. काही वेळानंतर साक्षीने आपल्या पतीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. 

बातम्या आणखी आहेत...