आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल लपवून ठेवत होती पत्नी, पतीने विचारले कारण...मिळाले असे उत्तर की बरबाद झाले आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्याप्रकारे अन्न, वस्त्र आणि निवारा आवश्यक गरजा आहेत त्याचप्रमाणे सध्याच्या काळात मोबाइलसुद्धा आवश्यक झाला आहे. लहान मुलं असो किंवा वृद्ध, महिला असो वा पुरुष प्रत्येकाला मोबाइल आवश्यक वाटतो. परंतु याच मोबाइलमुळे कितीतरी लोकांचे आयुष्य बरबाद झाले आहे. एक ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील आहे. येथे एका महिलेने मोबाइलमुळे आपल्या पतीला सोडून दिले आणि वेगळे राहू लागली.


भांडणाचे कारण का ठरला मोबाइल?
हे प्रकरण बुलंदशहरातील दनकौर भागातील आहे. मोबाइलसाठी एका पत्नीने आपल्या पतीला सोडून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइलमुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. पत्नीने मोबाइल वापरू नये अशी पतीची इच्छा होती. कारण पत्नी मोबाइलवरून इतर लोकांशी चर्चा करते असा पतीला संशय होता.


लपवून ठेवत होती मोबाइल, चोरून बोलत होती इतरांशी 
तरुणाने सांगितले की, त्याच्या लग्नाला चार वर्ष झाले. सर्वकाही ठीक चालू होते, परंतु मागील तीन-चार महिन्यांपासून पत्नीने एक मोबाइल लपवून ठेवला आहे. या मोबाइलवरून ती बाहेरच्या लोकांशी बोलते. पतीने या गोष्टीचा विरोध केल्यानंतर तिने सुरुवातील भांडण सुरु केले आणि नंतर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.


तरुणाने पोलिसांना सांगितली सर्व हकीकत 
गुरुवारी दनकौर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या पीडित पतीने आपले दुःख सांगत तक्रार दाखल केली. तरुणाने सांगितले की, त्याची पत्नी त्याला पोलीस स्टेशनमध्ये सोडून निघून गेली. तरुणाने पत्नीला परत घेऊन येण्याचीही पोलिसांकडे विनंती केली आहे. पोलिसांनी अजून कोणतीही तक्रार दाखल करून घेतलेली नाही. दोघांमधील वाद संपवण्यासाठी पत्नीला बोलावण्यात येईल आणि त्यानंतर दोघांची काउंसलिंग केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...