Home | National | Gujarat | Wife Left than Sister Accompanied Brother in Hard times

बहीण असावी तर अशी! अपघातामुळे तरुणाला झाला लकवा, पत्नीही गेली सोडून; पण बहिणीने जिवापाड जपले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 12:10 PM IST

रक्षाबंधन सणाला बहिणी आपल्या भावाकडून रक्षणाचे वचन घेतात, परंतु येथे एका बहिणीने असहाय, लाचार भावासाठी स्वत:चे घरसुद्धा

 • Wife Left than Sister Accompanied Brother in Hard times

  सुरत - रक्षाबंधन सणाला बहिणी आपल्या भावाकडून रक्षणाचे वचन घेतात, परंतु येथे एका बहिणीने असहाय, लाचार भावासाठी स्वत:चे घरसुद्धा सोडले. ही कहाणी पालनपूर जकात नाकाचे रहिवासी 38 वर्षीय राजू पटेल यांची आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांचा एक अपघात झाला होता. यात कमरेखालचा पूर्ण भाग लकवाग्रस्त झाला. हिंडण्या-फिरण्यात असमर्थ बनले. आयुष्य बेडवर झोपूनच घालवण्याची वेळ आली. पत्नी ज्योतीसुद्धा त्यांना सोडून निघून गेली. अशा कठीण परिस्थितीत राजू यांची 35 वर्षीय बहीण धावून आली आणि तिने अडीच वर्षांपासून भावाची जिवापाड काळजी घेतली. त्यांच्यासोबतच 2 लहान मुले आणि म्हाताऱ्या आईचाही सांभाळ केला.

  हंसा यांच्या पतीनेही केला पत्नीच्या निर्णयाचा सन्मान
  - राजू जेव्हा शारीरिक रूपाने अक्षम झाले, तेव्हा त्यांच्या जिवावर संकट आले. घरात दोन लहान मुलांसोबत म्हातारी आईसुद्धा होती.
  - या कठीण काहात राजूची बहीण हंसा देवदूत बनून आली. भावाची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सोडल्या.
  - टेम्पो चालवून घर चालवणारे राजू यांचे भाऊजी राजेंद्र पटेल यांनीही आपली पत्नी हंसा यांच्या निर्णयाचा सन्मान केला.
  - ते दिवसा टेम्पो आणि रात्री लॉरी चालवून राजू यांच्या उपचारांसाठी पैशांची व्यवस्था करतात.

  मग परतली राजूची पत्नी
  - बहिणीने जेव्हा आपल्या भावाची सेवा करत त्याच्या मुलांचाही सांभाळ केला, तेव्हा जवळजवळ अडीच वर्षांनंतर पत्नीसुद्धा घरी परतली. भावजयी नांदू लागल्यावर बहीण हंसा आपल्या घरी परतली. तथापि, आपल्या भावाची तब्येत जाणून घेण्यासाठी त्या न चुकता रोज पालनपूरला येतात.
  - याशिवाय आपल्या भावासाठी अशा कामाचा शोध घेतात, जे तो अंथरुणावर बसल्या-बसल्या करू शकेल. हंसा यांचे म्हणणे आहे की, भावाने काही काम केले, तर त्याच्या मनातही निराशा येणार नाही.

Trending