आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरोदर पत्नीचा खून करून मृतदेहाशेजारी रात्रभर झोपला पती, सकाळी उठून पोलीस ठाण्यात झाला हजर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरूम - गरोदर पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर रात्रभर मृतदेहाशेजारी झोपून राहिलेल्या पतीने सकाळी उठून पोलिस ठाणे गाठत खून केल्याची माहिती दिली. ही घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथे गुरुवारी (दि.८)  रात्रीच्या दरम्यान घडली.घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.  


मुरूम येथील संभाजीनगर येथील विनोद धनसिंग पवार (रा.बेळंब तांडा, ता. उमरगा)  याची पत्नी प्रियंका  ५ महिन्याची गर्भवती होती. विनोद याचा मुरूम येथे बोअरवेल कमिशन एजंटचा  व्यवसाय असून पत्नी प्रियंका ही तुळजापूर येथे नर्स म्हणून नोकरीस होती.  नुकतीच प्रियंकाची उमरगा येथे बदली झाली होती. मात्र अद्याप रिलीज करण्यात आले नसल्याने तुळजापूर येथे ड्युटी करून गुरुवारी (दि.७) सकाळी प्रियंका ही मुरूम येथे घरी परतली होती.बदली प्रकरणावरून गुरुवारी दोघा उभयंतात किरकोळ वाद झाला. दरम्यान विनोद हा रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला. 


पत्नी नेहमीच किरकोळ कारणावरून आपणास टोचून बोलते या रागातून त्याने प्रियंकाचा गळा दाबून खून करून मृतदेहा शेजारीच झोपी गेला. शुक्रवारी सकाळी उठून पोलिस ठाणे गाठत प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. याप्रकरणी पोहेकाॅ संदीपान कोळी यांनी मुरूम पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यावरून विनोद धनसिंग पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...