आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife Murdered Brutally By Husband With Knife And Spanner In Guru Gram Latest News

Murder: पत्नी सतत अपमान करायची, चिडून पतीने चाकूचे 41 वार केले, पान्याने डोके फुटून मेंदू बाहेर येईपर्यंत मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - सेक्टर-5 परिसरात एक विवाहितेची तिच्या पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या शरीरावर चाकूने 41 वार करण्यात आले आहेत. दुसरीकडे लोखंडी पान्याने तिच्या डोक्यावर एवढे वार केले की, तिचा मेंदू कवटी फुटून बाहेर आला. वंशिका (24 वर्षीय) ऊर्फ नेहा असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह 2017 मध्ये झाला होता.

 
चौकशीत आरोपी पती पंकजने सांगितले की, त्याची पत्नी त्याच्याशी नीट वागत नव्हती. ती तिच्या माहेरच्या माणसांचे ऐकून माझा अपमान करायची. यामुळे त्याच्या मनात खूप राग साचला होता. यामुळेच त्याने अशोक विहार फेज-1 मधील त्याच्या घरात तिची हत्या केली.


पोलिसांनी मृत महिलेचा पती पंकज भारद्वाज आणि कुटुंबातील आणखी तीन सदस्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पंकज भारद्वाज व नसीम अहमद यांना अटक करण्यात आली आहे. नसीम चाकू खरेदी करण्यापासून ते कट रचण्यापर्यंत सोबत होता. हत्येच्या कटाच्या आरोपावरून नसीमला अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये पंकजचे वडील विजय कुमार, आई बालेश आणि भाऊ हॅप्पी यांचा समावेश आहे. विजय कुमार गुडगावमध्ये एका स्थानिक दैनिकाचा संपादक आणि प्रकाशक आहे. दिल्लीच्या पटेल नगरातील रहिवासी असलेले मृत विवाहितेचे वडील महेश शर्मा म्हणाले की, लग्नाच्या काही दिवसांपासूनच त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता.

 

बातम्या आणखी आहेत...