आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याने गळा आवळून केला पत्नीचा खून; पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव- पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास हतनूर (ता.भुसावळ) येथे घडली. सोनी उर्फ मनीषा योगेश कोळी (वय २६) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित पती योगेश अशोक कोळी (रा.हतनूर) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे . 


संशयित योगेश कोळी (तायडे) व मनीषाचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर लग्नापासूनच संशयित पत्नीचा छळ करत होता. त्याने अनेकदा पत्नीला मारहाणदेखील केली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याने जुनी कुरापत काढून पत्नीच्या डोळ्यावर दुखापत केली होती, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप, हवालदार नागेंद्र तायडे, अतुल बोदडे, महेंद्र शिंगारे, राहुल येवले, गणेश शेळके, मुकेश जाधव यांनी घटनास्थळ गाठले. विवाहितेने गळफास धेऊन आत्महत्या केल्याची माहिती संशयिताने त्याच्या आई-वडीलांना दिली होती. मात्र, विवाहितेने फाशी घेतल्याचे कुठलेही व्रण तसेच मृतदेह लटकलेला नसल्याचे दिसून आले. पोलिसांना संशय आल्याने संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विवाहितेच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी बळीराम मन्साराम सपकाळे (वय ४७,रा. करंज, ता. जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरिक्षक सचिन सानप, हवालदार नागेंद्र तायडे पुढील तपास करत आहेत. विवाहितेवर माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


आत्महत्येचा बनाव 
मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास संशयित योगेशने मद्यधुंद अवस्थेत दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केला. तसेच पहाटे घराबाहेर येऊन आई-वडीलांना पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. याबाबत पोलिस पाटलांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर खुनाची घटना उजेडात आली. 

बातम्या आणखी आहेत...