आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून, पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना  देऊळगाव बाजार(ता.सिल्लोड) येथे मंगळवारी रात्री घडली. रवींद्र बनकर असे आरोपी पतीचे नाव असून  मंगलाबाई असे मृत विवाहितेचे नाव आहे.  खून करून पतीने पोबारा केला असून या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सासरा व दिरास अटक करण्यात आली आहे.


बुधवारी सकाळी सिल्लोड  ग्रामीण पोलिसांना देऊळगाव बाजार येथून फोन आला.   सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील हे देऊळगाव बाजार येथे गेले असता मंगलाबाई रवींद्र बनकर हिच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून करण्यात आल्याचे दिसले.    आरोपीने ज्या कुऱ्हाडीने पत्नीला मारले होते ती कुऱ्हाडही पोलीसांना घटनास्थळी सापडली.  पोलिसांनी ती जप्त केली. मृत मंगलाबाई यांचे वडील सूर्यभान कीसन सुसुंद्रे, रा दिगाव, ता. कन्नड यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पती रवींंद्र साहेबराव बनकर, सासूु लंकाबाई साहेबराव बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरा  व दीर यांना अटक केली अन्य आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी  पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वास पाटील करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...