आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे कापलेले शीर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहचली महिला, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आसाम राज्यातील लखीमपूरमध्ये एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात पत्नीने आपल्या पतीचे शीर धडापासून वेगळे केले. त्यांनतर शीर घेऊन पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. न्यूज एजंसी एएनआयनुसार, महिलेचा पती तिला दरदोज मारत असे. तसेच, पत्नीला आपल्या जीवाची भिती असल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले.


न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला लखीमपूरची रहिवासी असून मंगळवारी, (28 मे) रोजी तिने घरगुती वादातून आपल्या पतीची हत्या केली आणि शीर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली. महिलेने पोलिसांना सांगितले की, ''पती दररोज मारहाण करत होता आणि कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न करत असे. या सततच्या भांडणामुळे मी त्याला सोडण्याचा अनेकदा विचार केला पण मुलांमुळे मला असे करता आले नाही." या घटनेनंतर महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.


पोलिसांनी सांगितले की, महिलेने आपल्या पतीचे शीर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आली आणि आत्मसमर्पण केले. चौकशी केल्यानंतर महिलेने हत्येची कबूली दिली. पतीने दारू नशेत मारहाण केल्यामुळे आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे महिलेने सांगितले. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.