आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाच्या पत्नीने मैत्रिणीसोबत मिळून केली पतीची हत्या; 15 तास मृतदेहाला घरातच ठेवले, नंतर असा झाला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर(मध्यप्रदेश)- दोन दिवसांपूर्वी जंगलात मिळालेल्या एसएएफ जवानाच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जवानाची हत्या त्याच्या पत्नीने तिच्या मैत्रिणींसोबत मिळून केली. इतकच काय तर 15 तास तिने मृतदेहाला आपल्याच घरात लपून ठेवले. नंतर मृतदेहाला जंगलात फेकले.

 
जबलपूर एसपी अमित सिंह यांनी सांगितले की, सहाव्या बटालियनचे जवान राकेश यांची हत्या त्यांच्या पत्नीने पतीचे दारून पिणे आणि संशय घेऊन मारहाण करण्याला कंटाळून केली. जवानाच्या पत्नीने तिची अल्पवयीन मैत्री आणि आपल्या चुलत बहिणीसोबत मिळून ओढणीने गळा आवळून जवानाची हत्या केली. हत्येनंतर 15 तास पतीचा मृतदेह तिने आपल्या घरातच ठेवला आणि नंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या आईला बोलावून घेतले. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी दुर्गा बेन, तिची आई सुकरानी ठाकुर, 22 वर्षीय काजल आणि शेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले आहे. त्या सगळ्यांविरूद्ध हत्या करून मृतदेह लपवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

सीसीटीव्हीमुळे झाला खुलासा
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. पत्नी आणि जवानाच्या मोबाईलमुळ तपास करण्यास पोलिसांना सोपे झाले. रांझीपासून ईडीकेदरम्यान काही ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये पत्नी दुर्गा पतीच्या मृतदेहाला घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.